शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीवर ॲसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला धाब्यावरुन अटक, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 18:18 IST

देगलूर तालुक्यातील शेळगावातील अविनाश रामकिशन राजुरे हा आणि पीडित तरुणी हे दोघे जण दिवाळीसाठी गावाकडे परत येत होते. रात्र झाल्याने ते येळंबघाट परिसरात खडी क्रेशरजवळ मुक्कामासाठी थांबले होते.

ठळक मुद्देदेगलूर तालुक्यातील शेळगावातील अविनाश रामकिशन राजुरे हा आणि पीडित तरुणी हे दोघे जण दिवाळीसाठी गावाकडे परत येत होते. रात्र झाल्याने ते येळंबघाट परिसरात खडी क्रेशरजवळ मुक्कामासाठी थांबले होते

नांदेड- बीड जिल्ह्यात येळंबघाट परिसरात पुण्याहून गावी परत येत असताना प्रेयीसीवर ॲसिड हल्ला करण्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील फरार आरोपी अविनाश रामकिशन राजुरे याला देगलूर तालुक्यातील आदमपूर येथे एका धाब्यावरुन पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

देगलूर तालुक्यातील शेळगावातील अविनाश रामकिशन राजुरे हा आणि पीडित तरुणी हे दोघे जण दिवाळीसाठी गावाकडे परत येत होते. रात्र झाल्याने ते येळंबघाट परिसरात खडी क्रेशरजवळ मुक्कामासाठी थांबले होते. पहाटेच्या सुमारास अविनाशने तरुणीच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकले. तसेच पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यानंतर त्याने गंभीर भाजलेल्या तरुणीला सोडून घटनास्थळावरुन पळ काढला होता. तर दुसरीकडे पोलिसांनी जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. अविनाश हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहे. त्यामुळे बीड पोलिसांनी आरोपीबाबत नांदेड पोलिसांनी माहिती दिली होती. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनीही देगलूर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेची पथके परिसरात पाठविली होती. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास देगलूर तालुक्यातील आदमपूर येथे एका धाब्यावर जेवण करीत असल्याची टिप पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपासासाठी आता आरोपी अविनाश राजुरे याला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीBeedबीड