शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ५० रुपयांत पोस्टात खाते; नांदेड जिल्ह्यात ६५ हजार विद्यार्थ्यांनी उघडली खाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 18:31 IST

गणवेशाच्या रक्कमेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये उडालेल्या गोंधळाला पोस्टल बँकिंगने पूर्णविराम दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत ६५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी पोस्टात खाते उघडले असून बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्यांच्या गणवेशाची रक्कम पोस्टामार्फत मिळाली आहे.

ठळक मुद्देगणवेशाच्या रक्कमेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये उडालेल्या गोंधळाला पोस्टल बँकिंगने पूर्णविराम दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे़जिल्ह्यात आजपर्यंत ६५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी पोस्टात खाते उघडले

नांदेड : गणवेशाच्या रक्कमेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये उडालेल्या गोंधळाला पोस्टल बँकिंगने पूर्णविराम दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत ६५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी पोस्टात खाते उघडले असून बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्यांच्या गणवेशाची रक्कम पोस्टामार्फत मिळाली आहे़ 

शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्याऐवजी त्यासाठी लागणारी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला़ यानंतर शालेय विद्यार्थ्यांसह पालकांची बँकेत खाते उघडण्यासाठी लगीनघाई सुरू झाली़ दरम्यान, आधारकार्ड तसेच लिंकिंंगच्या अडचणी आदी तांत्रिक कारणामुळे तसेच पालकांच्या उदासीनतेमुळे बहुतांश विद्यार्थ्यांची खाती उघडली गेली नाहीत़ गणवेशासाठी मिळणारे ४०० रूपये मिळविण्यासाठी बँकेत खाते उघडण्यासाठी १००० रूपये, पालकाचा एक ते दोन दिवसांचा वेळ, त्यातून बुडणारा त्यांचा रोजगार, सोबत विद्यार्थी लागत असल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडणार आणि गाव, वाडी, वस्तीनजीक बँक नसेल तर परगावात जिथे बँक असेल तिथे जाण्यासाठी लागणारा खर्च आदीमुळे बहुतांश पालकांनी गणवेशाचे पैसे सोडून देण्याचाच निर्णय घेतला़ परंतु, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित राहत असल्याची विरोधी पक्ष आणि संघटना, पालकांकडून टीका होवू लागली दरम्यान, पोस्टाने सुरू केलेल्या पोस्टल बँकिंगमुळे विद्यार्थी, पालकांच्या पैशासह वेळेची बचत होत आहे़ पोस्टामध्ये खाते उघडण्यासाठी केवळ ५० रूपये लागत आहेत़ त्याचबरोबर पोस्टात पालक अथवा विद्यार्थ्यांना येण्याची गरज पडत नाही़ तसेच खाते उघडल्यानंतर गणवेशाची जमा झालेली रक्कम विद्यार्थ्यांना घरपोच अथवा शाळेत पोस्ट कर्मचार्‍यांमार्फत आणून दिली जात आहे़ त्यामुळे गणवेशासाठीचे खाते पोस्टात उघडण्याचा सपाटा लागला आहे़ १ एप्रिलपासून आजपर्यंत जवळपास ६५ हजार विद्यार्थ्यांनी खाते पोस्टात उघडले़

दरम्यान, आर्थिकदृष्ट्या मागास घटक, अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग, अल्पसंख्याकांना मिळणारी शिष्यवृत्ती पोस्टामार्फत उचलता येते़ त्यांचे हे खाते बँकेच्या सर्व प्रकारच्या व्यवहारासाठी वापरता येत असल्याने विद्यार्थ्यांचा कल पोस्टाकडे वाढला आहे़ मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शिक्षण विभागास पत्र लिहून शालेय गणेवश रक्कम जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पोस्टात खाते उघडण्याच्या सूचना केल्या होत्या. शाळेमार्फत एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला तर आमचे कर्मचारी त्या शाळेत अर्ज भरून घेवून विद्यार्थ्यांचे खाते उघडतील़ गणवेश, शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना घरपोच अथवा शाळेत दिली जाईल़ पोस्टात विद्यार्थ्यांची खाते उघडण्यास कोणी टाळाटाळ करीत असेल तर संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधिक्षक एस़ एम़ अली यांनी केले़ 

मुख्याध्यापकांचा पुढाकार महत्वाचाशाळेतील किती विद्यार्थ्यांचे बँकेत खाते नाही, गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही अशा सर्वांचे एकत्रित अर्ज पोस्ट कर्मचारी, कार्यालयात दिले तर त्यांचे एकाच वेळी खाते उघडणे सोयीचे होईल़ तसेच पोस्ट कर्मचार्‍यांना शाळेत येवून विद्यार्थ्यांचे अर्ज, कागदपत्र गोळा करणे सोपे होईल़ मुख्याध्यापक, शिक्षकांनी पुढाकार घेवून पोस्टाशी संपर्क साधल्यास येणार्‍या २६ जानेवारीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणेवश रक्कम मिळण्यास सुलभ होईल़