शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मोहीम अर्धवट राहिली, साताऱ्यातील हिरकणी रायडर्स ग्रुपच्या शुभांगी पवारचा अपघाती मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 13:12 IST

Accident in Nanded : या मोहिमेत ब्रेस्ट कॅन्सर, रस्ते सुरक्षा जनजागृती, महिला सबलीकरण करत १० जिल्हे व १४ तालुक्यातून हा ग्रुप जाणार होता.

ठळक मुद्देनांदेड-नागपूर रस्त्यावरील भोकरफाटा दाभड येथील घटना

- गोविंद टेकाळे

अर्धापूर ( नांदेड ) : साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या हिरकणी बाईक रायडर्सच्या गृपमधील शुभांगी संभाजी पवारचा ( ३२ ) अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे टँकरच्या धडकेत आज सकाळी १० वाजेदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. खराब रस्त्यामुळे बाईक स्लीप झाली आणि त्यानंतर टँकर ( जि.जे.१२ ए.टी.६९५७ ) डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 

हिरकणी बाईक रायडर ग्रुपच्यावतीने साडेतीन शक्तीपीठ दर्शन ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेत ब्रेस्ट कॅन्सर, रस्ते सुरक्षा जनजागृती, महिला सबलीकरण करत १० जिल्हे व १४ तालुक्यातून हा ग्रुप जाणार होता. या मोहिमेत शुभांगी पवार, मनिषा फरांदे, अंजली शिंदे, मोना निकम जगताप, अर्चना कुकडे, ज्योती दुबे, केतकी चव्हाण, भाग्यश्री केळकर, श्रावणी बॅनर्जी, उर्मिला भोजने यांचा सहभाग आहे. नऊ महिला सदस्या दि.१० ऑक्टोबर रोजी १ हजार ८६८ किमी प्रवासासाठी बाईकने निघाल्या. त्यांना खा. उदयनराजे व अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या होत्या. कोल्हापूर येथील महालक्ष्मी व तुळजापूर येथे भवानी मातेचे दर्शन घेऊन हा ग्रुप नांदेड येथुन - माहूर, वाशी, औरंगाबाद, नाशिक, वणी व पुन्हा सातारा असा जाणार होता. आज सकाळी १० वाजे दरम्यान हा ग्रुप अर्धापूर तालुक्यातील भोकरफाटा जात होता. दरम्यान, खराब रस्त्याने शुभांगी पवारची बाईक स्लीप झाली. रस्त्यावर कोसळल्या त्यांच्या डोक्यावर  टँकरचे चाक गेले. 

गुत्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावानांदेड - नागपूर महामार्गाचे काम सुरू असून संबंधित गुत्तेदार यांनी एका बाजुचा रस्ता दुरूस्ती न करता काम सुरू केले. गुत्तेदार यांच्या निष्काळजीपणामुळे हिरकणी रायडर्स ग्रुपच्या शुभांगी पवार यांचा अपघात झाला असल्याने या गुत्तेदार विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ओबीसी हक्क परिषदेचे प्रदेश महासचिव सखाराम क्षिरसागर यांनी केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेडUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले