शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

अबब...नांदेडमध्ये तीन वर्षानंतर होतेय पेट्रोलपंप तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 1:03 AM

नांदेड : जिल्ह्यातील पेट्रोलपंपाची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली असून तीन वर्षानंतर जिल्ह्यात पेट्रोलपंप तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत तीसहून अधिक पेट्रोल पंपाची तपासणी पूर्ण झाली असून कारवाईबाबत मात्र अद्याप माहिती प्राप्त झाली नाही.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय दक्षता पथकाची नियुक्ती : आतापर्यंत ३० हून अधिक पेट्रोलपंपाची तपासणी पूर्ण

अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील पेट्रोलपंपाची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली असून तीन वर्षानंतर जिल्ह्यात पेट्रोलपंप तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत तीसहून अधिक पेट्रोल पंपाची तपासणी पूर्ण झाली असून कारवाईबाबत मात्र अद्याप माहिती प्राप्त झाली नाही.जिल्ह्यात भारत पेट्रोलपंप कंपनी, इंडियन आॅईल आणि हिन्दुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांचे १४८ पेट्रोलपंप आहेत. भारत पेट्रोलियमचे ३०, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे ३१, इंडियन आॅईल कंपनीचे ४२, एसआर पेट्रोल कंपनीचे ७, रिलायन्स पेट्रोल कंपनीचा १ पेट्रोलपंप जिल्ह्यात आहे. या पेट्रोलपंपावर होणारी भेसळ, पेट्रोलपंपाचे माप पेट्रोल व डिझेलची घनता यामध्ये होणाºया गडबडी रोखण्यासाठी ही पथके तपासणी करणार आहेत. त्याचवेळी पेट्रोलपंपावर आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा पेट्रोलपंप चालक देतात की नाही? याची पाहणीही ही तपासणी पथके करणार आहेत. पेट्रोल पंपावर विद्युत पुरवठा बंद झाल्यास त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था आहे की नाही? याचीही तपासणी केली जाणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोलपंप तपासणीच्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येवून या तपासणीबाबत अधिक सूचना देण्यात आल्या. पेट्रोलपंपावरील भेसळ रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. त्याचवेळी पेट्रोल मीटर रिडींग मशिननुसार ग्राहकास दिले जाते की नाही? याचीही शहानिशा होणे आवश्यक आहे. मागील आठ दिवसात शहरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल कमी दिल्याची तक्रार वाहनधारकाने केली. ही घटना सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे.पेट्रोल पंपावरील अनियमिततांना रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय, विभागस्तरीय तसेच जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना केली आहे. नांदेड जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय दक्षता पथकात अप्पर जिल्हाधिकारी हे पदसिद्ध पथक प्रमुख राहणार आहेत. या पथकामध्ये जिल्हा पुरवठा अधिकाºयांसह इतर उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सहाय्यक, नियंत्रक, वैध मापनशास्त्र, तेल कंपन्यांचा जिल्हास्तरीय प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदार हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.या पथकाच्या स्थापनेनंतर पुरवठा विभागाने पेट्रोलपंपांची तपासणी सुरू केली असून आतापर्यंत ३३ पेट्रोलपंपांचे तपासणी करण्यात आली आहे. या तपासण्यामध्ये पेट्रोल वितरण करणारे मशिन, पेट्रोलची आवक, पेट्रोलचा साठा या बाबींची तपासणी करण्यात आली आहे. पेट्रोलचा साठा रजिस्टरप्रमाणे, मीटरप्रमाणे असणे आवश्यक आहे. त्याचवेळी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण पेट्रोल कंपन्यांनी ठरवून दिल्याप्रमाणे १० टक्याहून अधिक नसावे, हे अपेक्षित आहे.पेट्रोल पंपाच्या तपासणीत भेसळ आढळून आल्यास जप्त केलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्याचवेळी इसी अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्हास्तरीय दक्षता पथक स्थापन झालेले आहेच. त्याचवेळी तालुकास्तरीय विशेष पथकेही स्थापन करण्यात आली आहे. या तालुकास्तरीय पथकाद्वारे पेट्रोलपंपाची मासिक तपासणी केली जाणार आहे. नांदेड, भोकर, कंधार, देगलूर, बिलोली, हदगाव, धर्माबाद या उपविभागाच्या पथक प्रमुखपदी उपविभागीय अधिकारी राहतील. तर नांदेड, अर्धापूर, भोकर, कंधार, लोहा, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, धर्माबाद, उमरी, किनवट आणि माहूर तालुक्यातील सर्व तहसीलदार तसेच सर्व नायब तहसीलदार या तालुकास्तरीय पथकाचे सदस्य म्हणून काम पाहतील.त्याचवेळी सर्व पेट्रोलियम कंपनीच्या क्षेत्रिय अधिकाºयांचाही सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पेट्रोल पंप तपासणी सुरू केली असल तरीही आतापर्यंत केलेल्या तपासणीत नेमके काय आढळले ही बाब मात्र अद्याप पुढे आली नाही. कारवाईचा विषयही अद्याप अनुत्तरीतच आहे.पेट्रोल पंपावर सोयी-सुविधांचा अभाव४पेट्रोल पंपावर ग्राहकांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा देण्यास पेट्रोलपंप चालक टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल पंपावर वाहनधारकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह तसेच वाहनांमध्ये हवा भरण्याची सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. मात्र या नियमांचे पालन ग्रामीण भागात तर नाहीच पण नांदेडात मध्यवर्ती भागात चालणाºया पेट्रोलपंपावरही उल्लंघनच होत आहे. याकडे पुरवठा विभागाचे अधिकारी लक्ष देतील, हा प्रश्न आहे. काही पेट्रोल पंपावर हवा भरण्याची दुकाने आहेत मात्र ती वाहनधारकांकडून रक्कम घेवूनच हवा भरतात. विशेष म्हणजे पेट्रोल पंपचालकांना हे दुकानदार भाडेही देतात.वाहनधारकांनो नोझल्सकडे लक्ष ठेवा४पेट्रोलपंप भरताना नोझल्सचे बटन पूर्णपणे दाबलेले असणे आवश्यक असते. पेट्रोल भरताना नोझल्स दाबताच मीटरवर किमान ०.०३ च्या पुढे आकडे आले पाहिजे. पेट्रोल भरणाºया नोझल्स पूर्णपणे भरुन पेट्रोल वाहनाच्या टाकीत पडणे आवश्यक आहे. पेट्रोल भरणारे कर्मचारी नोझल्स पेट्रोलच्या टाकीत ठेवतात. परिणामी वाहनधारकांना नोझल्स मधून पेट्रोल किती पडत आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे नोझल्समधून पडणारे पेट्रोल पूर्ण क्षमतेने पडते की नाही? याकडे प्रत्येक वाहनधारकाने लक्ष देणे आवश्यक आहे. वाहनधारकांना पेट्रोलचे बील देणेही बंधनकारक आहे. तशी मागणी वाहनधारकांनी करावी.