शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत जोडो’साठी तिने एअर इंडियाच्या नोकरीवर सोडले पाणी! कोण आहे ही तरुणी? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 07:04 IST

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कन्याकुमारीपासून ११८ भारतयात्री सहभागी झाले आहेत. त्यामध्ये नाशिक रोड येथील एका तरुणीचा समावेश आहे.

नांदेड :

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कन्याकुमारीपासून ११८ भारतयात्री सहभागी झाले आहेत. त्यामध्ये नाशिक रोड येथील एका तरुणीचा समावेश आहे. आतिषा पैठणकर असे तिचे नाव. तिला तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर एअर इंडियात नोकरी मिळाली. ७ सप्टेंबरला तिचे जॉइनिंग होते. परंतु त्याच दिवशीभारत जोडो यात्रेला सुरुवात होणार होती. एका हातात नोकरीचे पत्र अन् दुसऱ्या हातात भारत जोडोचे पत्र अशा द्विधा मनस्थितीत असताना, तिने नोकरीवर पाणी सोडत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा  निर्णय घेतला.    

आतिषाचे कुटुंबीय मध्यमवर्गीय. घरात आई-वडील, भाऊ शिक्षण घेतोय तर मोठी बहीण वर्क फ्रॉम होम करते. आतिषाने इलेक्ट्रिकमध्ये इंजिनिअरिंग केले आहे. आतिषानेही तब्बल तीन वर्षे एअर इंडियातील नोकरीसाठी प्रयत्न केले.  एअर इंडियाने तिची मुलाखत घेतल्यानंतर ७ सप्टेंबरला तिला नोकरीवर रुजू होण्याचे पत्र पाठविले. तर इकडे आतिषाने भारत जोडो यात्रेत भारतयात्रीसाठी म्हणूनही मुलाखत दिली होती. 

६ सप्टेंबरला ती कोलकाता येथे जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहचली. परंतु नोकरी की भारत जोडो यापैकी कशाची निवड करायची? याबाबत तिच्या मनात द्वंद्व सुरू होते. अखेर तिने नोकरीवर पाणी सोडत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांना ही बाब कळाल्यानंतर त्यांच्या रोषाचा सामनाही करावा लागला. परंतु एक महिन्यात परत येऊन पुन्हा नोकरी करेल, असा शब्द तिने दिला. आईवडिलांच्या होकारानंतर आतिषाने थेट कन्याकुमारी गाठले.

नव्या भारतासाठी भारत जोडो यात्रा महत्त्वाची आहे. त्यातून देशभरातील तरुणाईशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्यांचे प्रश्न, अडचणी समजल्या. अनुभवाची ही शिदोरी पुढील आयुष्यात मोलाची ठरणार आहे. - आतिषा पैठणकर  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी