शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आरा मशिनला आग लागून लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:33 IST

येथून १२ किलोमीटरवरील कर्नाटकाच्या चोंडीमुखेड येथील आराम मशीनला मंगळवारी पहाटे आग लागून अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले़ उदगीर येथील अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली़ पण तोपर्यंत सर्व लाकूड व आरामशीन जळून खाक झाली़

मुक्रमाबाद : येथून १२ किलोमीटरवरील कर्नाटकाच्या चोंडीमुखेड येथील आराम मशीनला मंगळवारी पहाटे आग लागून अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले़ उदगीर येथील अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली़ पण तोपर्यंत सर्व लाकूड व आरामशीन जळून खाक झाली़या प्रकरणाची कुठेही नोंद नाही़ चोंडी मुखेड गाव कर्नाटकातील होकर्णा तालुका औराद वीदर या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येते़ होकर्णा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवकुमार यांच्याशी संपर्क केला असता, या घटनेची पोलीस स्टेशनला कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही़ हळणी बाराळीचे वन शिलेदार केरबा पितलवाड यांनी चोंडी मुखेड येथील जळालेल्या आराम मशीनला भेट दिली़चोंडी-मुखेड गाव कर्नाटकातील चिखली ग्रुप ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट आहे़ चिखली ग्रुप ग्रामपंचायतमध्ये चिखली, मुदखेड, बिजलगाव, चोंडी मुखेड अशा ४ गावाची १९ सदस्याची ग्रुप ग्रामपंचायत आहे़ या चिखली गावाला किंवा कर्नाटकच्या हद्दीत जाण्यासाठी चोंडी मुखेड वासियांना दहा किलो मीटरची महाराष्ट्राची हद्द पार पाडावी लागते़या कर्नाटक राज्याच्या चोंडी मुखेड या गावाच्या हद्दीत एकूण ४ आरा मशीन अनाधिकृतपणे चालतात़

टॅग्स :Nandedनांदेडfireआग