शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव पीकअप जीपची स्कूलव्हॅनला समोरून धडक; चालकासह ११ विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:15 IST

स्कूलव्हॅन चालकासह आठ विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी नांदेडला हलवले

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड) : शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जाणाऱ्या स्कूल व्हॅनला भरधाव येणाऱ्या पिकअप जीपने समोरासमोर धडक दिली यात चालक गंभीर जखमी झाला आहे. तर अन्य अकरा विद्यार्थी जखमी झाले असून काहींना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. सदर घटना आज शनिवार रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास तामसा रोडवरील नरहरी मंगल कार्यालयाजवळ घडली.

अर्धापूर ते तामसा रोडवर भरधाव वेगात येणाऱ्या लोडिंग पिकअप जीप ( क्र.(एम.एच ४० सी.एम ८२६५) ची शाळेतील विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कूलव्हॅनला (एम.एच २६ बी.ई ०७८७) समोरासमोर जोरदार धडक दिली. यात स्कूलव्हॕन चालक मनोज चंद्रकांत रणवीर ( २९ रा. लहान ता.अर्धापूर) याच्यासह अकरा विद्यार्थी जखमी झाले. अपघातानंतर पीकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला. 

अपघाताची माहिती मिळताच नरेंद्रचार्य रुग्णवाहिका चालक राजू पाचंगे,१०८ चे डॉ. आनंद शिंदे,चालक मारोती गिरी, १०२ चे संतोष कांबळे यांनी जखमी विद्यार्थ्यांना अर्धापूर व नांदेड येथे रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी नेले. यावेळी अधिक्षक विद्या झिने, डॉ. महम्मद शाहीन, डॉ.युवराज दाढाळे सह खाजगी डॉक्टरही यावेळी मदतीला धावले होते. दरम्यान, चालक मनोज रणवीर गंभीर जखमी असून त्याच्यासह ८ विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जखमी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे प्रमाणे: युवराज अमोल बारसे, संजय जगदीश पहाडे, समर्थ अमोल जाधव, गौरव गजानन वाघमारे, प्राची प्रसाद भोजे, सिद्धीका आनंद भुस्से, मयूर मारोती क्षिरसागर, विशाल वीरभद्र भुस्से, युवराज अवधूत शिंदे, वैष्णवी गजानन भोकरे, सदाशिव गणेश क्षीरसागर ही विद्यार्थ्यांची नावे डॉक्टरांकडून मिळाली आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड