शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील सालगड्याच्या घरात दरोडा; मारहाणीत पती-पत्नी जखमी

By प्रसाद आर्वीकर | Updated: November 21, 2023 18:59 IST

पती-पत्नीला मारहाणीत महिला गंभीर स्वरूपात जखमी नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू

लोहा : तालुक्यातील लांडगेवाडी येथे शेतात राहणाऱ्या सालगड्याच्या घरात घुसून सालगड्यासह त्याच्या पत्नीला जबर मारहाण करण्यात आली. पत्नीच्या अंगावरील सोन्या-चांदीने हिसकावून घेत चोरटे पसार झाल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे. चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लांडगेवाडी हे गाव माळाकोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. पोलिस ठण्यापासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. कंधार तालुक्यातील दुर्गा तांडा येथील महेरबान चव्हाण हे लांडगेवाडी येथील माजी सरपंच सोनबा लांडगे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ लगत हे शेत आहे. महेरबान चव्हाण, त्यांची पत्नी आणि मुले शेतातच राहतात. २० नोव्हेंबर रोजी रात्री महेरबान चव्हाण हे शेतातील कामे आटोपून घरात झोपले होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांनी महेरबान चव्हाण यांच्या पत्र्याच्या घराचा दरवाजा उचकून आत प्रवेश केला. 

महेरबान चव्हाण यांच्या पत्नी विमलबाई यांच्या गळ्यातील गंठण ५ ग्रॅम, पायातील वाळे, हातातील पाटल्या, धनकडे जोड, गळ्यातील पोत असे सोन्या- चांदीचे दागिने हिसकावून घेतले. महेरबान चव्हाण व पत्नी विमलबाई यांना जबर मारहाण केली. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय अधिकारी मारोती थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप निलपत्रेवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ, श्वान पथकालाही पाचारण केले होते. दोन्ही पथकांनी कसून चौकशी केली. मात्र, चोरट्यांचा सुगावा लागला नाही. माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

विमलबाईंची प्रकृती चिंताजनकविमलबाई यांच्या डोक्याला गंभीर मारहाण लागली असून, त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. महेरबान चव्हाण यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी चोरट्यांनी महेरबान चव्हाण यांचा मुलगा गणेश व सून चंद्रकला हे राहत असलेल्या घराला बाहेरून कोंडी लावून घेतली. त्यानंतर आई-वडील राहत असलेल्या घरात चोरी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड