शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

मानव विकासचे ८२८ आरोग्य शिबिरे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:17 IST

मानव विकासच्या वतीने गर्भवती महिला व स्तनदा मातांची तज्ज्ञ महिला डॉक्टरकडून आरोग्य तपासणी करण्यासाठी २०१९- २० या वर्षात ८२८ आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे़ गतवर्षी ८२० आरोग्य शिबिरे घेतले होते़ यावर्षीचे एप्रिलपासून शिबीरे होत आहेत.

ठळक मुद्देवर्षभर उपक्रम : गरोदर व स्तनदा मातांच्या आरोग्याची तपासणी

नांदेड : मानव विकासच्या वतीने गर्भवती महिला व स्तनदा मातांची तज्ज्ञ महिला डॉक्टरकडून आरोग्य तपासणी करण्यासाठी २०१९- २० या वर्षात ८२८ आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे़ गतवर्षी ८२० आरोग्य शिबिरे घेतले होते़ यावर्षीचे एप्रिलपासून शिबीरे होत आहेत.ग्रामीण व नागरी भागातील गरोदर व स्तनदा माता व बालके आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिले आहेत़यावर्षी एप्रिल महिन्यापासून शिबिरांचे आयोजन केले आहे़ लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे प्रा.आ. केंद्र येथे दरमहा दुसरा व तिसरा बुधवार, सोनखेड येथे तिसरा व चौथा मंगळवार, पेनूर येथे तिसरा सोमवार व तिसरा मंगळवार, कलंबर येथे पहिला व तिसरा मंगळवार कापशी येथे पहिला व दुसरा शुक्रवार, देगलूर प्रा.आ. केंद्र येथे दरमहा शहापूर येथे पहिला व तिसरा शुक्रवार, हणेगाव येथे पहिला व तिसरा मंगळवार मरखेल येथे दुसरा व चौथा मंगळवार, बिलोली प्रा.आ. केंद्र येथे दरमहा शंकरनगर येथे तिसरा व चौथा शुक्रवार, लोहगाव येथे पाहिला व चौथा मंगळवार, सगरोळी येथे पहिला व दुसरा मंगळवार, कुंडलवाडी येथे पहिला व तिसरा सोमवार, खतगाव येथे पहिला व तिसरा बुधवार. धर्माबाद प्रा.आ. केंद्र येथे दरमहा करखेली येथे चौथा सोमवार चौथा मंगळवार, उमरी तालुक्यात प्रा.आ. केंद्र येथे दरमहा सिंधी पहिला व तिसऱ्या शुक्रवारी शिबीर होणार आहे.६८ हजार ३८७ आरोग्य तपासण्या केल्या२०१९- २० या वर्षासाठी वेळापत्रकाप्रमाणे मानव विकास आरोग्य शिबिरे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत़ मागील वर्षी आरोग्य शिबिरांसाठी १ कोटी ४८ लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला होता़ त्यापैकी १ कोटी ४१ लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात आला़ या वर्षात ३९ हजार ६७४ गरोदर माता, १४ हजार ४०४ स्तनदा माता व १४ हजार ३०९ बालके असे एकूण ६८ हजार ३८७ आरोग्य तपासण्या करण्यात आल्या़

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्य