शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची ७३ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:23 IST

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आदिवासी प्रकल्पामधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यास शासनाच्या महिला व बालविकास विभागाने मंजुरी दिली असली तरी नांदेड जिल्ह्याला मात्र वगळले आहे़ आदिवासी किनवट तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची ७३ पदे रिक्तच राहणार असून या भागातील नागरिकांनी या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आदिवासी प्रकल्पामधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यास शासनाच्या महिला व बालविकास विभागाने मंजुरी दिली असली तरी नांदेड जिल्ह्याला मात्र वगळले आहे़आदिवासी किनवट तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची ७३ पदे रिक्तच राहणार असून या भागातील नागरिकांनी या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला़आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत असल्यामुळे नीती आयोगाचे महत्त्वाकांक्षी जिल्हे नंदुरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशिम तसेच डावी कडवी विचारसरणी यामधील गोंदिया, चंद्र्रपूर व भंडारा जिल्ह्यातील काही भाग, पालघर संपूर्ण जिल्हा, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, धारणी आणि चिखलदरा या तालुक्यांतील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे १ नोव्हेंबर २०१८ पासून भरण्यास शासन मंजुरी देत आहे़ मात्र या निर्णयात जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल तालुक्याचा समावेश नसल्याने किनवट तालुक्याला का वगळले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.किनवट तालुक्यातील ७१ अंगणवाड्यातील २ हजार ५०० बालकांना व ९०० गरोदर स्त्रिया, स्तनदामाता या एकवेळ चौरस आहार व बालकांना चार दिवस केळी, अंड्यापासून वंचित राहावे लागत आहे़

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणSchoolशाळा