शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री सौर कृषीतून नांदेड जिल्ह्यात ६८० मेगावॉट वीजनिर्मिती होणार

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: October 10, 2023 17:32 IST

आजपर्यंत १२९५ एकर शासकीय जमीन संपादित

नांदेड : महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यातून नांदेड जिल्ह्यातील कृषी फिडर सौरऊर्जीत करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी कार्यान्वित होत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३४०१ एकरांवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यातून ६८० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

ज्या गावात सरकारी जमिनी उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. या जमिनीचा मोबदला म्हणून महावितरणकडून प्रतिएकर प्रतिवर्षे ५० हजार रुपयांचे भाडे दिले जाणार आहे. त्यामध्ये दरवर्षी तीन टक्के वाढ केली जाईल. याकरिता महावितरणने लँड बँक पोर्टल सुरू केले आहे. आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात १२९५ एकर शासकीय, गायरान जमीन लीजवर घेतली आहे. यासाठी शासनाला प्रतिएकर एक रुपये याप्रमाणे नाममात्र शुल्क दिले जाते.

ज्या ग्रामपंचायती स्वयंस्फूर्तीने सहभागी होतील, त्यांना शासनाकडून प्रतिवर्ष ५ लाखांप्रमाणे तीन वर्षांत १५ लाखांचा निधी दिला जाणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना गतिमान करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात कृषी पंपाचे १२३ उपकेंद्र आहेत. या सर्व उपकेंद्राचे सौरऊर्जीकरण होणार असून, त्यातून ६८० मेगावॉट वीजनिर्मिती होईल. यासाठी जिल्ह्यात ३४०१ एकर जमिनीची गरज भासणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभा राहिल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा आणि अखंडित वीज मिळणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडे किमान तीन एकर, तर जास्तीत जास्त ५० एकर जमीन असणे आवश्यक आहे; तसेच ही जमीन महावितरण उपकेंद्राच्या परीक्षेत्रातील ५ ते १० किमी अंतरावर जमीन करार पद्धतीने घेतली जाणार आहे.

१२९५ एकर जमीन घेतली ताब्यातमहावितरणने जिल्ह्यात ३४०१ एकर जमीन भाडेतत्त्वावर घेण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, आजपर्यंत जिल्ह्यातील १२९५ एकर शासकीय व गायरान जमिनीचा भाडेकरार केला असून, ही जमीन ताब्यात घेतली आहे.

जमीन संपादनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षाजिल्ह्यात आजपर्यंत २५० शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी महावितरणकडे ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. मात्र, आजपर्यंत केवळ शासकीय जमीन भाडेत्त्वावर नाममात्र शुल्कात घेतली असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचा अद्यापही विचार झालेला नाही. त्यामुळे जमीन संपादनाची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच आहे.

कृषी पंपांना अखंडित मिळणार वीजमुख्यमंत्री सौर कृषी योजना कार्यान्वित झाल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी देण्यात येणार असून, अखंडित वीज मिळणार आहे.

जिल्ह्यात कृषी पंपाचे १२३ उपकेंद्रजिल्ह्यात एकूण १५० पेक्षा अधिक उपकेंद्र असून, त्यात कृषी पंपाचे १२३ उपकेंद्र आहेत. उपकेंद्राच्या १० एकर परीक्षेत्रातील जमीन करार पद्धतीने घेतली जाणार आहे. शासकीय जनीन नाममात्र दरात मिळत असल्याने खासगी जमीन घेण्यास महावितरणने अजून पुढाकर घेतलेला नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रmahavitaranमहावितरण