शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

देगलूर तालुक्यात खरिपाची नजरी आणेवारी ६० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:36 IST

तालुक्यातील मूग, उडीद वगळता इतर खरीप पिकांची नजरी आणेवारी सरासरी ६० टक्के काढण्यात आली असून ३१ आॅक्टोबरला सुधारित आणेवारी काढली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : तालुक्यातील मूग, उडीद वगळता इतर खरीप पिकांची नजरी आणेवारी सरासरी ६० टक्के काढण्यात आली असून ३१ आॅक्टोबरला सुधारित आणेवारी काढली जाणार आहे.तालुक्यातील खरीप पिके त्यात सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची महसूल प्रशासनाने सरासरी नजरी आणेवारी ३० सप्टेंबर रोजी ६० टक्के काढली आहे. मूग व उडीद पिकाची कापणी प्रयोग करुन या दोन पिकांची सरासरी आणेवारी ५० टक्क्यांच्या खाली काढण्यात आली. महसूल प्रशासनाने मूग व उडिदाच्या उत्पन्नावर वस्तुस्थितीला धरून आणेवारी काढली आहे.सोयाबीनचा पेरा तालुक्यात सर्वाधिक आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र या पिकाने शेतकºयांना कोणत्या का कारणाने होईना दरवर्षीच दगा दिला. सोयाबीनला लागणारा एकूण खर्च बघता व त्यामानाने निघत असलेले अत्यल्प उत्पादन तसेच मिळणारा कमी भाव शेतकºयांना त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढविण्यास मदत करणाराच ठरला. येत्या ३१ आॅक्टोबरला सुधारित आणेवारी सोयाबीनची किती काढली जाते, हेही शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अंतिम आणेवारी १५ डिसेंबर रोजी काढली जाणार असून यावरच शेतकºयांना आधार द्यायचा की त्यांना वाºयावर सोडण्याची भूमिका घेतली जाते, हे समजेल.निजामकालीन आणेवारी पद्धत बदलणार कधी ?निजामाचे राज्य असताना आणेवारी काढण्याची जी पद्धत होती तीच पद्धत आणेवारी काढताना आजही वापरली जाते. तेव्हाची शेती करण्याची पद्धत व आजच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. शेतकºयांचा खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. उत्पन्न व खर्च तसेच मिळणाºया भावाची सांगड घालून आणेवारी काढण्याची नवीन पद्धत शासनाने अंमलात आणणे हे शेतकºयांच्या दृष्टीने गरजेचे झाले आहे. राज्यकर्त्यांना आणेवारी काढण्याची नवीन पद्धत अंमलात का आणावी वाटत नाही. आजपर्यंत कोणत्याही आमदारांनी आणेवारी काढण्याच्या पद्धतीत सुधारणा करावी यासाठी विधानसभेत अथवा विधान परिषदेत सात्यत्यपूर्ण आवाज उठवून शासनाला आणेवारी काढण्याची पद्धत बदलण्यास भाग पाडले.

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई