शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

नांदेड जिल्ह्यात ८ लाख रोपांसाठी ६ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:29 IST

शासनाच्या वतीने गतवर्षी राज्यभरात ४ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आला. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापैकी जवळपास ९ लाख ५० हजार ८९३ रोपे नांदेड वन विभागाच्या वतीने लावण्यात आली होती. यापैकी ८ लाख ४८ हजार ८८४ रोपटी जिवंत असून या रोपट्यांच्या संवर्धनासाठी शासनाला ६ कोटी २१ लाख ५४ हजार ४३९ रूपये खर्च करावे लागले आहेत. परंतु, एका रोपावर सरासरी ७२ रुपये २१ पैसे एवढा खर्च करण्यात आला़ मात्र प्रत्यक्षात यापैकी किती रोपे जगली, हा संशोधनाचा विषय आहे़

ठळक मुद्देवन विभाग : गतवर्षी ९ लाख ५० हजार ८९३ रोपांची लागवड, यंदा ६० लाखांचे उद्दिष्ट

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शासनाच्या वतीने गतवर्षी राज्यभरात ४ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आला. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापैकी जवळपास ९ लाख ५० हजार ८९३ रोपे नांदेड वन विभागाच्या वतीने लावण्यात आली होती. यापैकी ८ लाख ४८ हजार ८८४ रोपटी जिवंत असून या रोपट्यांच्या संवर्धनासाठी शासनाला ६ कोटी २१ लाख ५४ हजार ४३९ रूपये खर्च करावे लागले आहेत. परंतु, एका रोपावर सरासरी ७२ रुपये २१ पैसे एवढा खर्च करण्यात आला़ मात्र प्रत्यक्षात यापैकी किती रोपे जगली, हा संशोधनाचा विषय आहे़वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा -हास होत असल्यामुळे शासनाकडून दरवर्षी वृक्षलागवड उपक्रम राबविल्या जात आहे. मागील वर्षभरात विविध विभागाच्या वतीने जिल्ह्यात ३५ लाखांवर वृक्षलागवड करण्यात आली आहे. वर्षभर या रोपांचे संवर्धन व संगोपनाची जबाबदारी ही त्या-त्या विभागावर सोपविण्यात आली होती. परंतु, बहुतांश विभागांनी वृक्ष लागवडीनंतर त्याकडे लक्षच दिले नसल्याने अल्प कालावधीत रोपे करपून गेली. मागील पावसाळ्यात वन विभागाच्या वतीने जिल्हाभरातील वनक्षेत्रात ९ लाख ५० हजार ८९३ रोपे लावण्यात आली होती. यामध्ये निकृष्ट वनाचे पुनर्वनिकरण योजनेंतर्गत कृष्णापूर, येवली, उमरी, कोळी, मनाठा, कळगाव, नांदा, वाई, टाकराळा, चिखली, गवंडे महागाव, पाटोदा, रामपूर या गावांत २२५ हेक्टरवर १ लाख २६ हजार रोपट्यांची लागवड केली होती. त्यापैकी १ लाख १३ हजार ७७७ रोपे जिवंत आहेत. यावर ९० लाख ७५ हजार ८६२ रूपये खर्च झाला आहे.मृद संधारणार्थ वनिकरणअंतर्गत जांभळा, बेंद्री, आमदारवाडी, दाबदरी, कुंडलवाडी, चित्तगिरी, लहान, पिंपळकुटा या गावांतील १८० हेक्टरवर लागवड केलेल्या १ लाख सहा हजार ८७५ रोपांपैकी ९२ हजार २३१ रोपे जिवंत असून यावर ८१ लाख २० हजार ७५१ रूपयांचा खर्च झाला आहे.तसेच वन्यजीव व्यवस्थापन व निसर्ग संरक्षण योजनेंतर्गत कुंचेली येथील १२ हेक्टरवर लागवड केलेल्या १८०० पैकी १६०२ रोपे जिवंत असून २ लाख ५९ हजार २३६ रूपये तर वन पर्यटन इको टुरीजम योजनेंतर्गत सहस्त्रकुंड येथे लागवड केलेल्या एक हजारपैकी ९००, निकृष्ट वनाचे पुनर्वनिकरण अंतर्गत माहूर वनक्षेत्रात १९६८ लागवड केली असून त्यापैकी १४७६ रोपे जिवंत ठेवण्यासाठी जवळपास साडेपाच लाख रूपयांचा खर्च आला आहे.तसेच संयुक्त वन व्यवस्थापनांतर्गत नारवट येथे लावगड केलेल्या २ लाख ६९ हजार ६४३ रोपांना जिवंत ठेवण्यासाठी ४ लाख ८६ हजार ७६२ तर मृद संधारणांतर्गत वनिकरणमध्ये माहूर, किनवट, उमरी, भोकर, हदगाव, लोहा, मुखेड, नायगाव व बिलोली या तालुक्यांत २०० हेक्टरवर लागवड केलेल्या १ लाख ४४ हजार रोपांसाठी ९२ लाख ४७ हजार ३९१ रूपये इतका खर्च करण्यात आला आहे.---आठ लाख रोपे जिवंत असल्याचा दावासंयुक्त वन व्यवस्थापनांतर्गत लागवड केलेल्या ५५ हजार रोपांपैकी ४९ हजार ४४५ रोपे जिवंत ठेवण्यासाठी १८ लाख तीन हजार रूपये तर वनिकरणाचा भरगच्च कार्यक्रम राज्य योजनेतंर्गत लागवड केलेल्या ४ लाख ३५ हजार २५० रोपांपैकी ३ लाख ८८ हजार ८५८ रोपांच्या संवर्धनासाठी २ कोटी ९७ लाख ६० हजार ३१७ रूपये खर्च केले आहेत. त्याचबरोबर कृत्रिम पुनर्निर्मिती अंतर्गत लागवड केलेल्या ३० हजार रोपांपैकी २६ हजार ६० रोपे जिवंत असून त्यावर १५ लाख २१ हजार १६० रूपये खर्च करण्यात आला आहे. अशा प्रकारे विविध योजनेंतर्गत लागवड केलेल्या रोपांपैकी डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत जिवंत रोपांची मोजणी झालेल्या आकडेवारीनुसार ८ लाख ४८ हजार ८८४ रोपांवर आतापर्यंत ६ कोटी २१ लाख ५४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड