शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हा परिषदेतील ५३ कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:50 IST

अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या गट ‘ड’ मधील कार्यरत ५३ कर्मचा-यांना गट ‘क’ पदावर फेरनियुक्ती देण्यात आली आहे़ संवर्ग- ३ मध्ये आलेल्या या सर्व कर्मचा-यांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली़ सदर कर्मचारी ३ एप्रिल रोजी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत़

ठळक मुद्दे नामावलीप्रमाणे केली पदस्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या गट ‘ड’ मधील कार्यरत ५३ कर्मचा-यांना गट ‘क’ पदावर फेरनियुक्ती देण्यात आली आहे़ संवर्ग- ३ मध्ये आलेल्या या सर्व कर्मचा-यांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली़ सदर कर्मचारी ३ एप्रिल रोजी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत़शासकीय सेवेत अनुकंपा ही सवलत असून या सवलतीद्वारे दिवंगत कर्मचा-यांच्या पाल्यांना सेवेत नियमानुसार घेण्यात येते़ त्यानंतर अनुकंपा तत्त्वावरील कर्मचा-यांना १९९६ च्या शासन निर्णयानुसार सदर कर्मचा-याची शैक्षणिक पात्रता लक्षात घेवून त्यांना जिल्हा परिषदेमधील रिक्त पदावर फेरनियुक्ती देण्यात येते़ सोमवारी याच पद्धतीने ५३ कर्मचा-यांना गट क मध्ये फेरनियुक्ती देण्यात आली असून यात १८ कंत्राटी ग्रामसेवक, १४ आरोग्य सहाय्यक, १२ कनिष्ठ सहाय्यक (लेखा), ३ वरिष्ठ सहाय्यक (लेखा), २ विस्तार अधिकारी (पंचायत), १ विस्तार अधिकारी (सांख्यिकी), २ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि १ पशूधन पर्यवेक्षक अशा ५३ जणांचा समावेश आहे़१९९६ व २०१० च्या निर्देशानुसार वर्ग ४ परिचरांच्या आदेशात कालांतराने वर्ग ३ चे पद रिक्त झाल्यानंतर त्यांना गट ड प्रवर्गात फेरनियुक्ती देण्याची अट आहे़ या नियमानुसार एकूण २३ परिचरांच्या मूळ आदेशात वरीलप्रमाणे अट नमूद नव्हती़ याप्रकरणी जिल्हा परिषदेने शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते़ शासनाने या प्रकरणी आपल्या स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते़त्यामुळे वर्ग-४ मधील २३ परिचर यांना गट क या संवर्गात फेरनियुक्ती देण्यात आली़ यानुसार अशा ३० परिचरासोबत एकूण २३ जणांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार क गट संवर्गात वर्ग केल्याचे आदेश देण्यात आले़ जिल्हा परिषदेच्या या कार्यवाहीचे कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड यांनी स्वागत केले आहे़ सदर कर्मचाºयांना फेरनियुक्ती मिळावी यासाठी काही दिवसांपासून पाठपुरावा सुरु होता. या मागणीची सकारात्मक दखल घेत कार्यवाही केल्याने अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांना न्याय मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचाºयांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे अनुकंपा कर्मचाºयांची मोठी मागणी मान्य झाल्याचे सांगत, नियोजित प्रशिक्षणामुळे नव्या कामाची स्वरुप समजेल असे सांगितले.फेरनियुक्त कर्मचाºयांना देणार प्रशिक्षणगट ‘ड’ मधील ५३ कर्मचाºयांना गट ‘क’ पदावर फेरनियुक्ती देण्यात आली आहे़ या कर्मचाºयांच्या कामात पारदर्शकता यावी त्याबरोबरच त्यांना त्यांच्या नव्या कामाचे स्वरुप समजावे यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले़ नियुक्ती दिलेल्या सर्व कर्मचाºयांनी ३ एप्रिल रोजी त्यांना नेमून दिलेल्या जागी रुजू व्हावे, असेही निर्देश दिले असल्याचे ते म्हणाले़

टॅग्स :Nanded zpनांदेड जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी