शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

ऊसतोड कामगाराच्या मुलाची नीट परीक्षेत ५२० गुण; गावकऱ्यांना मिळणार पहिला डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 19:26 IST

कोणत्याही सुविधा नसताना, घरात उच्च शिक्षणाचा वारसा नसताना दुर्गम खेड्यात राहून प्रकाशने मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक परिपाठ ठरणार आहे.

- बालाजी नाईकवाडेहणेगाव (नांदेड): डोक्यावर विस्तीर्ण आकाशाचे छत आणि उसाच्या फडाजवळच मिळालेली मोकळी जागा अशा खरतर परिस्थितीतून अभ्यास करून ऊसतोड कामगारांच्या मुलाने नीट परीक्षेमध्ये ५२० गुण मिळविले आहेत. देगलूर तालुक्यातील दामला नाईक तांडा येथील प्रकाश राठोड या विद्यार्थ्याने हे यश मिळविले आहे. प्रकाश राठोड याच्या रूपाने दुर्लक्षित तांड्याला आता पहिला डॉक्टर मिळणार आहे.

तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा तीन राज्याच्या सीमेवरील दामलानाईक तांडा. साखर कारखान्याच्या गळीत हंगामात गावोगाव भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या श्रमिक कुटुंबात प्रकाश राठोड याचा जन्म झाला. लहानपणापासूनच हलाखीची परिस्थिती, आई-वडिलांनी उदरनिर्वाहासाठी हातात घेतलेला कोयता. अशा परिस्थितीत प्रकाशने वस्ती शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले.

जनापूर येथील चंगळामाता आश्रम शाळेत सातवीपर्यंत आणि कै. इंदिराबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले. शिक्षणाची गोडी लागल्याने प्रकाशने जिद्दीने अभ्यास केला. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यादृष्टीने तयारी सुरू केली. कोणत्याही भौतिक सुविधा नसताना, मार्गदर्शकांचा अभाव असतानाही प्रकाशने नीट परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या तीन प्रयत्नांत अपयश पदरी पडले. मात्र खचून न जाता जिद्दीने तयारी केली. अखेर चौथ्या प्रयत्नांत त्याने यशाला गवसणी घातली. 

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यात प्रकाशला ५२० गुण मिळाले असून, डॉक्टर होण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणत्याही सुविधा नसताना, घरात उच्च शिक्षणाचा वारसा नसताना दुर्गम खेड्यात राहून प्रकाशने मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक परिपाठ ठरणार आहे.

लोकमतच्या यश कथेने घडविले परिवर्तनबारावीपर्यंत कोणतेही ध्येय समोर नव्हते. मात्र एकेदिवशी कॉलेजमधून गावाकडे येत असताना वाटेत लोकमत पेपर रस्त्यावर पडलेला दिसला. पेपर उचलून तो वाचत असताना त्यात शेतकरी कुटुंबातील मुलाने नीट परीक्षेत मिळविलेल्या यशाची यशोगाथा प्रकाशित झाली होती. ती यशोगाथा वाचली आणि डॉक्टर होण्याचे तेथेच ठरविले. लोकमत पेपरनेच माझ्यात परिवर्तन घडविले आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले, असे प्रकाश राठोड याने सांगितले.

अख्या गावाच्या आनंदाला नव्हता पारावरप्रकाश राठोड याने नीट परीक्षेत ५२० गुण मिळविल्याची वार्ता गावात समजताच अख्खे गाव आनंदित झाले. गावचे उपसरपंच मुजिपोद्दीन पटेल, पोलीस पाटील ताजीयोद्दीन पटेल, सहशिक्षक अशोक राठोड, सामाजिक कार्यकर्ते शेख मुबिन आदींनी प्रकाशच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले. तसेच प्रकाशच्या यशात वाटा उचलणाऱ्या लोकमतचे आभार मानले आहेत.

गावाला मिळणार पहिला डॉक्टरप्रकाश राठोड याची वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, त्याच्या माध्यमातून हनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या दामला नाईक तांडा गावाला पहिला डॉक्टर मिळणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNandedनांदेड