शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:41 IST

आॅनलाईन बदली प्रक्रियेवेळी खोटी माहिती व खोटे दस्तऐवज दाखल करुन अनियमितता केल्या- प्रकरणी जिल्ह्यातील ५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ या नोटिसीत आपली एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी का बंद करु नये ? तसेच आपली इतरत्र बदली का करु नये ? अशी विचारणा करण्यात आली

ठळक मुद्देआॅनलाईन बदलीसाठी खोटी माहिती दिलीवार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्याचा इशारा

नांदेड : आॅनलाईन बदली प्रक्रियेवेळी खोटी माहिती व खोटे दस्तऐवज दाखल करुन अनियमितता केल्या- प्रकरणी जिल्ह्यातील ५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ या नोटिसीत आपली एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी का बंद करु नये ? तसेच आपली इतरत्र बदली का करु नये ? अशी विचारणा करण्यात आली असून या शिक्षकांना याप्रकरणी तीन दिवसांत खुलासा सादर करायचा आहे़नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा प्रथमच शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन पद्धतीने करण्यात आल्या़ या बदली प्रक्रियेदरम्यान काही शिक्षकांनी खोटी माहिती तसेच बनावट दस्तऐवज तयार करुन बदलीमध्ये लाभ उठविल्याचा आरोप होत होता़ या अनुषंगाने बदली प्रक्रियेचा फटका बसलेल्या इतर शिक्षकांनीही जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली होती़ या समितीने दोन दिवसांत आक्षेप असलेल्या शिक्षकांसह तक्रारदारालाही पाचारण करुन सदर प्रकरणी चौकशी केली़ मात्र त्यानंतरही संबंधित शिक्षकांविरुद्ध काहीच कारवाई न झाल्याने दोषी शिक्षकांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून जोर धरत होती़या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी १२ डिसेंबर रोजी आॅनलाईन पद्धतीने बदली झालेल्या ५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़ या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, बदली प्रक्रियेवेळी शिक्षकांनी आवेदनपत्रात खरी माहिती भरुन स्वंयघोषित प्रमाणित करणे क्रमप्राप्त होते़ मात्र संगणकीय प्रणालीद्वारे झालेल्या बदल्यामध्ये खोटी माहिती भरुन बदल्या करुन घेतल्याचे निदर्शनास आले आहे़ या अनुषंगाने तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या अहवालाद्वारे आपणास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ नोटीस बजावण्यापूर्वी आपणास सुनावणीसाठी प्रत्यक्ष बोलावून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे़ मात्र चौकशी समितीच्या अहवालात आपण बदली प्रक्रियेदरम्यान खोटी माहिती व खोट्या कागदपत्रांद्वारे बदली करुन घेतल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्यामुळे यासंबंधीच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार आपली एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करुन आपली इतरत्र बदली का करु नये ? याबाबतचा खुलासा तीन दिवसांत सादर करावा अन्यथा नमूद शास्ती कायम करण्यात येईल, असा इशाराही शिक्षणाधिका-यांनी नोटिसीमध्ये दिला आहे़नोटीस बजावलेल्या शिक्षकांमध्ये सुलभा रत्नपारखी (जि़प़शाळा रहाटी ता़नांदेड), शिवदर्शन लांडगे (जि़प़शाळा नवीन वसाहत बारड ता़मुदखेड), सतीश जानकर (जि़प़शाळा शंकतीर्थ, ता़मुदखेड), सुरेखा कमळू (जि़प़शाळा बेलानगर, ता़नांदेड), सुनीता भुरे (जि़प़शाळा बाभूळगाव ता़नांदेड), वैजनाथ मिसे (लख्खा ता़देगलूर) साईनाथ इडलवार (अंतापूर, ता़देगलूर) फातिमा शेख (तडखेल, ता़देगलूर), गोविंद नल्लावाड (बोंडार, ता़नांदेड), शोभा गंदलवाड (झरी, ता़लोहा), धनराज कानवटे (ब्रंच, ता़मुखेड), शोभा मुंडे (ब्रंच, ता़ मुखेड), गजानन देशमुख (मरळख खु़, ता़नांदेड), अमोल पोलशेटवार (सिद्धनाथ/वाजेगाव ता़नांदेड), रमेश अंनतवार (मडकी, ता़लोहा), सागर जिलकरवार (तलबीड, ता़नायगाव), अर्चना नागठाणे (कृष्णूर ता़नायगाव), सुनीता राठोड (कन्या शाळा नायगाव), प्रमोद जोगदंड (खैरगाव, ता़नायगाव), गीताबाई शिनगिरे (कुंटूर, ता़नायगाव), अनुजा उपलंचवार (शेळगाव छत्री, ता़नायगाव), मनीषा नरसीकर (किन्हाळा, ता़बिलोली), माधव मोरे (होंडाळा, ता़मुखेड), गुरुनाळ हराळे (मेंढला, ता़अर्धापूर), संदीप पाटील (बरडशेवाळा कॅम्प, ता़हदगाव), अपर्णा चाटे (पिंपरणवाडी, ता़ लोहा), राजनंदा मुरडे (वडेपुरी, ता़लोहा), अनुराधा भुरे (वडेपुरी,ता़लोहा), स्मिता कुहाडे (वडेपुरी, ता़लोहा), मोहन कांबळे (रमतापूर, ता़देगलूर), बसवंत कोळनूरकर (प्रा़शा़मुखेड), प्रकाश पवार (प्रा़शा़मुखेड), नीळकंठ भोसले (थुगाव, ता़नांदेड), दीपाली सोनपूरकर (वाडी पुयड, ता़नांदेड), शीला निजवंते (रावणकोळा, ता़मुखेड), अ़अय्युब अग़णी (नई आबादी, ता़अर्धापूर), नसरीन बेगम शेख अजीम (वाजेगाव, ता़नांदेड), नुजहद सुल्ताना अ़हई (गनीमपुरा, ता़नांदेड), अनिता रणभीरकर (कामठा, ता़अर्धापूर), काशीबाई उदगिरे (कामठा, ता़अर्धापूर), विनायक बारहाते (कामठा, ता़अर्धापूर), विद्या चंदापुरे (वसंतनगर, नांदेड), कामाजी डांगे (यमशेटवाडी, ता़अर्धापूर), संगीता कारले (पिंपळगाव, ता़अर्धापूर), अनुप नाईक (कडीमगंज, ता़नांदेड), उषा वरड (हरबळ, ता़लोहा), अंबादास कदम (असर्जन, ता़नांदेड), प्रेमला जाधव (जुन्नी, ता़धर्माबाद), अर्चना चौधरी (नाळेश्वर, ता़नांदेड), रमेश मरखेलकर (ब्राम्हणवाडा, ता़नांदेड) आणि यमुनाबाई बाळासाहेब शिंदे (मंढई सांगवी बु़, ता़ नांदेड) या ५१ शिक्षकांचा समावेश आहे़शैक्षणिक वर्तुळात खळबळ : शिक्षकांचे धाबे दणाणलेजिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेली आॅनलाईन बदलीप्रक्रिया सातत्याने वादात राहिली़ बदली प्रक्रियेदरम्यान बनावट कागदपत्रांचा मुद्दा पुढे आल्यानंतर ज्या शिक्षकांवर या प्रक्रियेदरम्यान अन्याय झाला त्यांनी आंदोलन केले़ दुसरीकडे समिती स्थापन करुन या सर्व शिक्षकांची चौकशी सुरु होती़ आता जिल्ह्यातील ५१ दोषी शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्याने या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत़ या शिक्षकांची बदली रद्द होऊ शकते याबरोबरच एका वार्षिक वेतनवाढीलाही त्यांना मुकावे लागेल़

टॅग्स :NandedनांदेडTeacherशिक्षकNanded zpनांदेड जिल्हा परिषदTransferबदली