शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात ४६९ स्वंयचलित हवामान केंद्र स्थापणार, ग्रामपंचायत स्तरावर जागेचा शोध सुरू

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: August 17, 2023 19:38 IST

ग्रामपंचायतीने स्वयंचलित हवामान केंद्रे उभी करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देण्याबाबत कृषी आयुक्तांनी आदेशित केले आहे.

नांदेड़‘स्कायमेट’च्या महावेध प्रकल्पांतर्गत हवामानाची माहिती घेण्यासाठी स्कायमेटने राज्यात यापूर्वी २१२७ हवामान केंद्र उभारलेले आहेत़ मात्र ही हवामान केंद्रे तोकडी पडत असून, सध्याचे वेगवेगळ्या भागातील बदलते वातावरण आणि पावसाची परिस्थिती पाहता अजून हवामान केंद्राची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील सुमारे दहा हजार ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचे निश्चित केले असून नांदेड जिल्ह्यातील ९३ महसूल मडळात ४६९ स्वंयचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत.

ग्रामपंचायतीने स्वयंचलित हवामान केंद्रे उभी करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देण्याबाबत कृषी आयुक्तांनी आदेशित केले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात हवामान केंद्र उभारणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल तेथे स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, यायची दिशा वाऱ्याचा वेग आदी हवामानविषयक माहिती उपलब्ध करून पीकविमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य, आपत्ती व्यवस्थापन या प्रकारच्या विविध उपक्रमांसाठी माहितीचा वापर होतो. यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या असून हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अचूक महिती मिळण्यास मदत होणारजिल्ह्यात हवामान केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक गावातील पावसाची अचूक माहिती मिळण्याला अडचणी येत होत्या. आता नवीन हवामान केंद्रे उभी केल्यानंतर ही अडचण दूर होणार आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीची बिनचूक माहिती मिळेल आणि त्याचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील ९३ महसूल मंडळात प्रत्येकी पाच याप्रमाणे ४६९ हवामान केंद्र स्थापन केले जाणार असले तरी ४९७ ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्धतेबाबत माहिती मागविण्यात येत आहे.

हवामान केंद्रासाठी तालुकानिहाय जागेचा शोधस्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी कृषी विभागाकडून ग्रामपंचायतींना जागा उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी सूचित केले आहे़ त्यानुसार नांदेड ४७ मुदखेड १७ अर्धापूर १७ कंधार ३७ लोहा ३७ नायगाव ३२ मुखेड ४२ देगलूर ३७ बिलोली ३२ धर्माबाद २२ उमरी २२ भोकर २७ हदगाव ४२ हिमायतनगर १७ किनवट ४७ तर माहूर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींकडे जागा उपलब्धतेची माहिती मागितली आहे.

टॅग्स :NandedनांदेडweatherहवामानRainपाऊस