शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिमायतनगर तालुक्यात ४० टक्के शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:33 IST

तालुक्यात सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असून यावर्षी पावसाअभावी खरीप, रबी हंगामातील पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे़

हिमायतनगर : तालुक्यात सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असून यावर्षी पावसाअभावी खरीप, रबी हंगामातील पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे़ तर दुसरीकडे, तालुक्यातील ४० टक्के शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत़शासनाच्या कर्जमाफी योजनांचा लाभ केवळ ६० टक्के शेतकऱ्यांना झाला आहे़ नियमित कर्ज भरणारे शेतकरी अद्यापही प्रतीक्षेतच आहेत़ या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये अनुदान तत्त्वावर त्यांच्या खात्यात जमा करणार असले तरी, अगोदर त्या खात्यावरील इतर सर्व कर्जाचा बोजा उतरावा लागणार आहे,ही त्यासाठीची अट आहे़ नियिमत कर्ज भरणा-यांमध्ये अल्पभूधारक शेतकरी अधिक आहेत़ त्यामुळे शासनाकडून सरसकट सर्वच शेतकºयांची कर्जमाफी होईल, या आशेवर शेतकरी आहेत़जो शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेत बसत नाही,अशा शेतक-यांना बँक अधिकारी आपले कर्ज भरण्याच्या सूचना देत आहेत. पुनर्गठण असणा-या श्ेतक-यांच्या खात्यावरील पैसे बँक कापून घेत त्या खात्यावर होल्ड लावला जात आहे़ पेरणीचे दिवस जवळ आले आहेत़ शेतीतील नांगर, वखरणी करून पेरणीसाठी शेती सज्ज ठेवली असली तरी, बी-बियाण,े खते खरेदी कशी करावी? हा मोठा प्रश्न आहे़बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ४० टक्के शेतक-यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही़ हिमायतनगर शहरातील स्टेट बँक शाखेत ६ हजार ६०० शेतक-यांचे खाते असून त्या खात्यानुसार एकूण ४४ कोटी ३० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ९३२ शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला असून त्यांचे २६ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे़ तर २ हजार ५०० शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत असून त्यांच्यावर १८ कोटी ५० लाख रुपये कर्ज आहे़दीड हजार जण वंचितसरसम येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत एकूण ५ हजार शेतक-यांवर ३६ कोटी ८ लाख रुपये कर्ज आहे़ त्यातील ३ हजार ५३२ शेतक-यांच्या खात्यावरील २१ कोटी ९५ लाख रुपये कर्ज माफ झाले आहे़ तर २ हजार ५५० शेतकरी या कर्जमाफी योजनेतून वंचित राहिले असल्याची माहीती मिळाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडbankबँकFarmerशेतकरी