शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

कंधार तालुक्यात नऊ दिवसांत ४ हजार शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:30 IST

तालुक्यात ५९ गवांत शौचालय (वैयक्तिक) बांधकाम करण्यासाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसले. अवघ्या नऊ दिवसांत ३ हजार ९६७ बांधकाम पूर्ण करण्याची किमया साधली. त्यामुळे पाणंदमुक्त गावाची संख्या ९४ झाली असून शिल्लक २२ गावांनी ५ हजार ६१८ शौचालय बांधकाम पूर्ण केल्यास तालुका पाणंदमुक्त होणार आहे. त्यासाठी कामाची गती अशीच राहणे आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यात ५९ गवांत शौचालय (वैयक्तिक) बांधकाम करण्यासाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसले. अवघ्या नऊ दिवसांत ३ हजार ९६७ बांधकाम पूर्ण करण्याची किमया साधली. त्यामुळे पाणंदमुक्त गावाची संख्या ९४ झाली असून शिल्लक २२ गावांनी ५ हजार ६१८ शौचालय बांधकाम पूर्ण केल्यास तालुका पाणंदमुक्त होणार आहे. त्यासाठी कामाची गती अशीच राहणे आवश्यक आहे.तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी पंचायत समितीने मोठे नियोजन केले. अनेक समस्यांना सामोरे जाताना दमछाक झाली. निधीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर कामांना खीळ बसली. वरिष्ठ पातळीवरुन निधी उपलब्ध झाला. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील निधीचा वापर (चौदावा वित्त आयोग) करण्यास मुभा देण्यात आली. १५ फेब्रुवारीपर्यंत पाणंदमुक्त तालुका करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थ व अधिकारी-कर्मचारी समन्वयाने अडथळ्यावर मात करण्यासाठी सरसावले आणि त्याला यश मिळू लागले. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात कामे गतीने झाली.१५ ते २३ फेब्रुवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत ५९ गावांत ३ हजार ९६७ शौचालयांची कामे पूर्ण करण्यात आली. रेतीचे गगनाला भिडलेले भाव, पाण्याचा प्रश्न आदींवर मात करण्याचा करीत ३५ गावे पाणंदमुक्त करण्यात यश आले. त्यामुळे तालुक्यातील पाणंदमुक्त गावाची संख्या आता ९४ झाली. आता संपूर्ण ११६ गावे पाणंदमुक्त करण्यासाठी यंत्रणा तत्परतेने कार्यरत झाली आहे.तालुक्यातील ११६ पैकी ९४ गावे पाणंदमुक्त झाली आहेत. त्यातील ९ गावे ओडीएफ झाली असून आॅनलाईन दिसत नसल्याची माहिती पंचायतच्या सूत्रांनी दिली. अशामध्ये बामणी, धानोरा (कौठा), तेलूर, दिग्रस (बु), दिग्रस (खु), नंदनवन, उमरज, वहाद आणि येलूर गावांचा समावेश आहे. अजून २२ गावे पाणंदमुक्त करण्यासाठी मोठी धांदल सुरु आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) राबविण्याचा संकल्प तडीला नेण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.आता तालुका पाणंदमुक्त होण्यासाठी अत्यल्प अवधी लागणार आहे. २२ गावांतील शिल्लक बांधकामे करण्यावर जोर दिला जात आहे. त्यात आंबुलगा १७५, औराळ १०३, बाचोटी १८९, बोरी बु. ११७, चिखली २५७, दहीकळंबा १९२, गऊळ २१० घोडज, २६५, गोणार २८६ गुंटूर २०२, कल्हाळी १६७, खंडगाव (ह) २०९, कुरुळा ५२६, मंगलसांगवी १३५, मसलगा ३१०, नागलगाव १७३, पानभोसी २७२, फुलवळ २०९, पेठवडज ८०९, शेकापूर १२३, शिराढोण ११३ आणि उस्माननगर ५७३ असे ५ हजार ६१८ शिल्लक शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ ं