नांदेड : प्रयागराज महाकुंभ मेळ्यावरून अयोध्येकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात होऊन ४ भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य १९ जण जखमी झाले. ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडली. मृतांत नांदेडच्या तिघांचा, तर हिंगोलीच्या एका महिलेचा समावेश आहे.
नांदेडमधील छत्रपती चौक परिसरात राहणारे सुनील दिगंबर वरपडे (५०), अनुसया दिगंबर वरपडे (८०), दीपक गणेश गोदले (४०) आणि हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजेबुवा येथील जयश्री पुंडलिकराव चव्हाण (५०) यांचा अपघातात मृत्यू झाला. १९ जखमींना लखनौ येथील गोसाईगंज येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.