शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत रोहित्रासाठी ४ कोटी १६ लाखांच्या निधीस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:03 IST

मागील काही दिवसांपासून महावितरणच्या विद्युत रोहित्रासंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. या अनुषंगाने महावितरणच्या वतीने २९९ नवीन रोहित्रांची खरेदी करण्यात येणार असून यासाठीच्या ४ कोटी १६ लाख ८४ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबरोबरच दाभड येथील बावरीनगर बौद्धविहारासह सात स्थळे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मागील काही दिवसांपासून महावितरणच्या विद्युत रोहित्रासंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. या अनुषंगाने महावितरणच्या वतीने २९९ नवीन रोहित्रांची खरेदी करण्यात येणार असून यासाठीच्या ४ कोटी १६ लाख ८४ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबरोबरच दाभड येथील बावरीनगर बौद्धविहारासह सात स्थळे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनाच्या मुख्य सभागृहात पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर शीलाताई भवरे यांच्यासह आ. डी. पी. सावंत, आ. सुभाष साबणे, आ. अमर राजूरकर, आ. वसंत चव्हाण, आ. हेमंत पाटील, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. विक्रम काळे, आ. प्रदीप नाईक, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी आदींसह जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामावर चालू वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना मिळून वितरित केलेल्या तरतुदीच्या ५४ टक्के खर्च झाला आहे. उर्वरित निधीतून विकासकामांना तातडीने गती द्यावी, असे सांगतानाच १०० टक्के खर्च होईल. यादृष्टीने सर्व विभागांनी नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री कदम यांनी या बैठकीत दिल्या.प्रारंभी जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेच्या चालू वर्षीच्या खर्चाचा आढावाही घेण्यात आला. सप्टेंबरअखेरपर्यंत झालेल्या खर्चानुसार सर्वसाधारण योजनेच्या ७४ कोटी ७९ लाख रुपयांच्या वितरित तरतुदींपैकी ८४ टक्के निधी खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेच्या ६२ कोटी ७८ लाख २७ हजार रुपये वितरित तरतुदींपैकी ३२ टक्के निधी खर्च झाला आहे. याशिवाय आदिवासी उपयोजनेच्या २३ कोटी ६९ लाख रुपयांच्या वितरित तरतुदींपैकी १६ टक्के खर्च संबंधित यंत्रणांकडून झाल्या असल्याची माहिती यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. याच बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेतील बांधकाम स्वरूपांच्या कामाच्या यादीस सभागृहाच्या वतीने मान्यता देण्यात आली.दुष्काळ निवारणासंदर्भात स्वतंत्र बैठक घेणारजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांनी दुष्काळी स्थितीसंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले. विशेषत: पिण्याच्या पाण्यासह वीज वितरण कंपनीकडून होत असलेले भारनियमन तसेच बंद पडलेल्या विद्युत रोहित्रासंबंधीच्या प्रश्नांचा समावेश होता. यावर जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याने दुष्काळ निवारणासंदर्भातील विविध प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्री रामदास कदम यांनी या बैठकीत जाहीर केले.या स्थळांना तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळांचा दर्जासोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकासाचा मुद्दा प्राधान्याने पुढे आला. त्यानंतर जिल्ह्यातील विविध सात स्थळांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात बावरीनगर दाभड येथील बौद्धविहार, हदगाव तालुक्यातील तळणी येथील लवंडेश्वर मंदिर व भवानी मंदिर, हदगाव तालुक्यातीलच शिऊर येथील महादेव मंदिर, मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथील खंडोबा मंदिर, भीमटेकडी व ईदगाह मैदानाला ‘क’ दर्जाचे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले. दरम्यान, यातील दाभड येथील बौद्धविहाराला २००४ साली तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. आता पर्यटनस्थळ म्हणूनही घोषणा झाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदD.P. Sawantडी. पी. सावंतelectricityवीज