शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

३६४ सहायक पोलिस निरीक्षकांना आदल्या रात्री पदोन्नती; दुसऱ्या दिवशी स्थगनादेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 20:05 IST

रिलिव्ह-जॉईनिंग रोखले, पदोन्नतीला ‘ब्रेक’ लागल्याने ३६४ सहायक पोलिस निरीक्षकांचा आनंद ठरला औटघटकेचा 

नांदेड : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २१ ऑगस्ट रोजी राज्यातील ३६४ सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक म्हणून नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी हे पोलिस अधिकारी उत्सुक होते. मात्र त्यांचा हा आनंद अवघ्या काही तासातच मावळला. कारण या पदोन्नतीला मॅटमधील एका प्रकरणामुळे ब्रेक लागला आहे.

राज्याच्या विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया पाटील-यादव यांच्या स्वाक्षरीने ३६४ ‘एपीआय’ला पदोन्नती देऊन पोलिस निरीक्षक बनविण्यात आले होते. त्यांना पसंतीचा महसूल विभाग वाटप करून पदोन्नतीवरील पदस्थापनाही निश्चित केली गेली होती. यातील अनेक सहायक पोलिस निरीक्षक वर्षानुवर्षे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. मात्र कायदेशीर अडचणी व तांत्रिक बाबींमुळे त्यांची पदोन्नती रखडली होती. बहुप्रतिक्षित ही पदोन्नतीची यादी २१ ऑगस्टला जारी झाली. ३६४ पोलिस निरीक्षक नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तयारी करीत असतानाच अवघ्या काही तासांत पदोन्नतीचा आदेश फिरला. २२ ऑगस्टला महानिरीक्षक सुप्रिया पाटील-यादव यांनी दुसरा आदेश जारी केला. ज्यात पदोन्नतीवर सहायक पोलिस निरीक्षकांना कार्यमुक्त न करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. मुंबई येथे मॅटमध्ये कुण्या अधिकाऱ्याने प्रकरण (क्रमांक ८३४ / २०२५) दाखल केले. त्यामुळे ३६४ सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीला तूर्त ब्रेक लागला आहे.

पुढील आदेशापर्यंत वाट पहामॅटमधील या प्रकरणाच्या अनुषंगाने निरीक्षक पदावर पदोन्नती मिळालेल्या कुणालाही कार्यमुक्त करण्यात येऊ नये, जेथे पदोन्नतीवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले गेले असेल त्यांना पूर्वीच्या पदावर अर्थात मुळ घटकात परत पाठविण्याचे आदेश जारी करण्यात आले. पुढील आदेशापर्यंत पदोन्नतीची ही स्थिती राहणार आहे. आदल्या रात्री पदोन्नती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्थगनादेश अशी स्थिती ३६४ पोलिस निरीक्षकांबाबत निर्माण झाली आहे. आनंदोत्सव साजरा करण्यापूर्वीच पदोन्नतीला ब्रेक लागल्याने पोलिस अधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

 

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिस