शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात ३१ बालकामगारांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:18 IST

शहरातील विविध हॉटेल, फूलविक्री दुकाने तसेच अन्य ठिकाणी काम करणाऱ्या ३१ बालकामगारांची शिवाजीनगर पोलिसांनी सुटका केली आहे. ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत ही कामगिरी करण्यात आली.

ठळक मुद्देआॅपरेशन मुस्कान : हॉटेलचालक, फूलविक्रेत्यांना नोटीस

नांदेड : शहरातील विविध हॉटेल, फूलविक्री दुकाने तसेच अन्य ठिकाणी काम करणाऱ्या ३१ बालकामगारांची शिवाजीनगर पोलिसांनी सुटका केली आहे. ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत ही कामगिरी करण्यात आली.बालकामगारांकडून काम करुन घेणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु, शहरातील अनेक आस्थापनांमध्ये अत्यल्प मोबदला देवून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात आहे. ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत पोलिसांनी २३ आणि २४ डिसेंबर रोजी या बालकामगारांच्या सुटकेसाठी मोहीम राबविली. मोहिमेअंतर्गत कारवाई करुन शिवाजीनगर पोलिसांनी ३१ बालकामगारांची सुटका केली.शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील, पोकॉ. मीनाक्षी बनसोडे, चालक पुलकुंठवार हे गत चार दिवसांपासून विविध आस्थापनांवर लक्ष ठेवून होते. सोमवारी अचानक छापेमारी करत तब्बल ३१ बालकामगारांची सुटका या पथकाने केली. शिक्षण घेण्याच्या बालवयात या मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडणाºया त्यांच्या पालकांना ठाण्यात बोलावून समुपदेशन करण्यात आले.निराधार मुलांना शेल्टर होममध्ये पाठविण्यात येणार आहे. बालकामगारांना यापुढे कामावर ठेवल्यास संबंधित आस्थापना मालकावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पोनि. सुरवसे यांनी दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत हरवलेल्या निराधार व काम करणा-या बालकांना पालकांकडे सुपूर्द करण्यात येत आहे.कामगार कल्याण अधिकारी कार्यालय बेखबरच१४ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांना कोणत्याही अस्थापनांमध्ये कामावर ठेवू नये असा नियम आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-या अथवा कामावर ठेवणा-या व्यक्तीवर बालकामगार कायद्यान्वये कारवाई करता येते. यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी कामगार कल्याण अधिका-यांची आहे. मात्र नांदेड शहरात हे कार्यालय नावापुरतेच असल्याचे विविध आस्थापनांत बालकामगारांची संख्या पाहून दिसून येते.

टॅग्स :NandedनांदेडChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाCrime Newsगुन्हेगारी