शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कृष्णास्वामी कस्तुरीरंगन यांच्या उपस्थितीत मंगळवारी होणार स्वारातीम विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 7:19 PM

१२ हजार ८५७ विद्यार्थ्यांना पदवी-पदविकांचे वाटप करण्यात येणार आहे़

ठळक मुद्दे २७६ विद्यार्थ्यांना पीएच़डी़ पुढील वर्षीपासून महाविद्यालय स्तरावर पदवी वितरण

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मंचावर कुलगुरू डॉ़उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे़ या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉक़ृष्णास्वामी कस्तुरीरंगन यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ़उद्धव भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली़  

पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ़आऱएम़ मुलानी, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ़रवि एऩसरोदे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ़अशोक कदम यांची उपस्थिती होती़ या दीक्षांत समारंभामध्ये २७६ विद्यार्थ्यांना पीएच़डी़ पदवी प्रदान करण्यात येणार असून १२ हजार ८५७ विद्यार्थ्यांना पदवी-पदविकांचे वाटप करण्यात येणार आहे़ मागील वर्षापर्यंत ४७ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देवून गौरविण्यात येत होते़ यंदापासून ५० विद्यार्थ्यांचा या पदकाने गौरव करण्यात येणार आहे.

यात श्रुती कुलकर्णी (एम़बी़ए़), शिवहर अढळकर (एम़ए़ राज्यशास्त्र), शांतागिरी (बीक़ॉम़) या तीन विद्यार्थ्यांना तर प्रतीक्षा लोंढे (एम़एस्सी़ प्राणीशास्त्र), तांबोळी बिरादार (एम़एस्सी़ रसायनाशास्त्र), विधी पळसापुरे (बी़एस्सी़ वनस्पतीशास्त्र), रविना ढगे (एम़एस्सी़ भौतिकशास्त्र), रुपाली गुब्रे (एम़ए़ अर्थशास्त्र), राखी मोरे (बी़ए़राज्यशास्त्र) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल अश्विनी उटगे हिच्यासह नागेश दरेकर (एम़एस्सी़ कम्प्युटर), ललिता उन्हाळे (एम़एस्सी़ वनस्पतीशास्त्र), अजित चव्हाण (बी़ई़ यांत्रिकी), शाल्वी अमिलकंठवार (एम़सी़ए़), साक्षी अग्रवाल (बी़एस्सी़ इलेक्ट्रॉनिक्स), सिंधुताई शिंदे (बी़ई़ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन), शेख मुबीन (बी़एस्सी़ रसायनशास्त्र), दिपाली सोनवणे (एम़ए़ हिंदी), श्वेता परिहार (बी़एस़एल़ एलएलबी), अश्विनी केवटे (पदव्युत्तर पत्रकारिता), हरज्योतकौर शाहू (विधी), मोहीत रासे (एम़ए़ एम़सी़जे़), अंकिता गायकवाड (बी़ए़भूगोल), रिना कराड (एम़ए़ इतिहास), निरज बासटवार (बीक़ॉम़ मुलांमध्ये सर्वप्रथम), रोहिणी मोरे (एम़एस्सी़ गणित), ज्योती सोमवंशी (एम़ए़ समाजशास्त्र), संगीता जाधव (एम़ए़ तत्त्वज्ञान), सुरेखा वाघमोडे (एम़ए़ लोकप्रशासन), कल्याणी जाधव (एल़एल़एल़ बीजनेस लॉ), ज्योती सूर्यवंशी (बी़एस्सी़ सॉफ्टवेअर इंजिनिअरींग), मिरा मलीशे (बी़एस्सी़ जैवतंत्रज्ञान), धनश्री गिरी (एम़एस्सी़ सॅन), नजीब नासेर (एम़एस्सी़ भौतिकशास्त्र), संध्या अर्सनाळकर (एम़ए़ मराठी), महेश वानोळे (बी़एस्सी़ कम्प्युटर), जयपाल गायकवाड (बीसीए) यांच्यासह एम़ए़ मानसशास्त्र विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल मनीषा देशमुख आणि जनाबाई पाळवदे यांना विभागून सुवर्ण पदक देण्यात येणार आहे़ 

दरम्यान, दीक्षांत समारंभास उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी पांढरी पँट, कॉलरसहीत पांढरा शर्ट तर विद्यार्थिनींनी पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज किंवा पांढऱ्या रंगाचा ओढणीसह पंजाबी ड्रेस परिधान करणे आवश्यक आहे़ समारंभास उपस्थित राहून पदवी, पदविका घेण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील वेगवेगळ्या कक्षामधील एकूण २१ खिडक्यामधून पदवी प्रमाणपत्र घ्यावे़ त्यासाठी शुल्काची व आवेदनपत्र दाखल केल्याची मुळ पावती सादर करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे़ दीक्षांत समारंभाच्या यशस्वीतेसाठी कुलसचिव डॉ़आऱएम़ मुलानी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीचे गठन करण्यात आले असून या अंतर्गत २६ समित्या कार्यरत आहेत़ 

पुढील वर्षीपासून महाविद्यालय स्तरावर पदवी वितरण२६ फेबु्रवारी रोजी यंदाचा दीक्षांत समारंभ पार पडल्यानंतर पुढील वर्षीपासून महाविद्यालय स्तरावर पदवी वितरण कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ़उद्धव भोसले यांनी सांगितले़ परीक्षा आवेदन पत्र भरतानाच विद्यार्थ्यांकडून पदवीसाठीचे शुल्कही भरून घेण्यात येईल़ त्यानंतर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादिवशी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या चारही जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना पदव्या वितरीत केल्या जातील़ ही महाविद्यालये आपआपल्या स्तरावर पदवी वितरण कार्यक्रमाचे आयोजन करतील, अशी माहितीही कुलगुरू डॉ़भोसले यांनी दिली़ 

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय