शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भोकर न्यायालयाचा भ्रष्टाचाराविरुद्ध मोठा निकाल; लाचखोर अभियंत्याला सक्तमजुरीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 19:40 IST

या खटल्यात एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, ज्यावरून आरोपीने पदाचा गैरवापर करून लाच घेतल्याचे सिद्ध झाले.

भोकर (जि. नांदेड): शाळेच्या बांधकामाचा निधी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या भोकर पंचायत समितीतील तत्कालीन अभियंता तुकाराम आनंदराव चौतमल यांना भोकर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ८ एप्रिल रोजी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. १० वर्षांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत चौतमल दोषी आढळले आहेत. न्यायाधीश मोहम्मद नसिर मोहम्मद सलीम यांनी हा निकाल दिला असून, कारावासासोबतच आरोपीला एकूण १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

१८,९०० रुपयांच्या धनादेशासाठी अडवणूकहे प्रकरण २०१४ मधील असून, फिर्यादी अशोक सोळंके हे ताटकळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत शाळेच्या बांधकामासाठी मंजूर झालेल्या निधीतील १८,९०० रुपयांचा उर्वरित धनादेश देण्यासाठी अभियंता चौतमल यांनी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २,५०० रुपये ठरले आणि त्यापैकी १,५०० रुपये स्वीकारताना 'एसीबी'ने त्यांना रंगेहाथ पकडले होते.

सहा साक्षीदारांची साक्ष ठरली निर्णायकया प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक भीमराव शिंगाडे यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजादरम्यान सरकारी वकील ॲड. अनुराधा डावखरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, ज्यावरून आरोपीने पदाचा गैरवापर करून लाच घेतल्याचे सिद्ध झाले. न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमान्वये आरोपीला दोषी धरत ही सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या निकालामुळे शासकीय कामात लाच मागणाऱ्या प्रवृत्तींना चाप बसणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ACB Nanded Success: Corrupt Engineer Sentenced to Rigorous Imprisonment.

Web Summary : A former engineer was sentenced to one year of rigorous imprisonment and fined ₹10,000 for demanding a bribe to release school construction funds. ACB caught him accepting ₹1,500. Six witnesses testified, proving abuse of power. The court convicted him under anti-corruption laws.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCourtन्यायालयNandedनांदेड