शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड विभागात २० लाख मे. टन गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:37 IST

नांदेड विभागात ३० कारखान्यांद्वारे सुमारे २० लाख मे. टन उसाचे गाळप करण्यात आले असून यंदाही मागील वर्षीप्रमाणेच विक्रमी गाळपाची शक्यता आहे.

ठळक मुद्दे३० कारखाने सुरू पुढील वर्षी घटणार साखरेचे उत्पादन

नांदेड : नांदेड विभागात ३० कारखान्यांद्वारे सुमारे २० लाख मे. टन उसाचे गाळप करण्यात आले असून यंदाही मागील वर्षीप्रमाणेच विक्रमी गाळपाची शक्यता आहे. पुढील वर्षी मात्र अत्यल्प पावसामुळे साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.२०१४ ते १७ या तीन वर्षांत मराठवाड्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यामुळेच २०१६-१७ यावर्षी मराठवाड्यात केवळ ०.९३ लाख हेक्टर एवढीच ऊसलागवड झाली होती. २०१७ च्या पावसाळ्यात मराठवाड्यात दमदार पाऊस झाल्याने उसाच्या क्षेत्रामध्येही तब्बल ५६.५४ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळेच २०१७ मध्ये २.१४ लाख हेक्टरवर ऊस लागवड पोहोचली होती. यंदा नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूरसह नांदेड जिल्ह्यातील ३६ कारखान्यांनी गाळपासाठी प्रस्ताव पाठविले होते. त्यातील ३० कारखाने सुरू झाले आहेत. सद्य:स्थितीत या कारखान्यांकडून १७ लाख ८० हजार २१५ क्विंटल साखरेचे उत्पादनही झाले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप जोमात राहील. त्यानंतरही ऊस शिल्लक राहिल्यास मार्च अखेरपर्यंत काही कारखान्यांचे गाळप सुरू राहील. मात्र मार्चमध्ये उन्हाचा तडाखा जाणवू लागल्यानंतर गाळप झाले तरी रिकव्हरी कमी होण्याची शक्यता आहे. यंदा ऊस कारखानदारी जोमात असली तरी यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानाचा फटका या कारखानदारीला पुढील वर्षी सोसावा लागणार आहे.मराठवाड्यात यंदा बहुतेक जिल्ह्यांत परतीच्या पावसाने पाठ फिरविली आहे. अपुऱ्या पावसामुळे डिसेंबर महिन्यापासूनच जमिनीतील पाणीपातळी घटत चालली आहे. पाण्याबरोबरच विजेच्या कमतरतेमुळे शेतकरी असहाय्य झाल्याने तो ऊस लागवडी पासून दूर जाण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी मराठवाड्यातील साखर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची चिन्हे आहेत. याबरोबरच काही भागात ऊसाच्या मुळावर हुमणी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्याचा परिणाम पुढील वर्षी मराठवाड्यातील साखर उत्पादनावर होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

  • २०१६-१७ मध्ये नांदेड विभागातील ५ जिल्ह्यात १० लाख ६३ हजार ९५७ मे. टन एवढे गाळप झाले होते. तर २०१७-१८ मध्ये १ कोटी १८ लाख मे. टन गाळपाजवळ कारखाने पोहोचले होते. आणि १ कोटी २५ लाखाहून अधिक क्विंटल उत्पान झाले होते. यंदाही कारखान्यांची त्याच दिशेने घोडदौड सुरू आहे.
टॅग्स :NandedनांदेडSugar factoryसाखर कारखाने