शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

२० जेसीबी,२०० हायवाद्वारे उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:06 IST

बेसुमार वाळू उत्खननामुळे मेळगाव घाट मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच गाजला होता. यावर्षी या घाटाची लिलाव प्रक्रिया पार पडली असून, पहिल्याच दिवशी तब्बल वीस जेसीबी व दोनशे हायवा टिप्परच्या सहाय्याने बेसुमार वाळू उत्खनन करण्याचा सपाटा सुरु झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देमेळगावात बेसुमार वाळू उपसा नियम कागदावरच; पर्यावरण संकटात, प्रशासनाची डोळेझाक

कुंटूर : बेसुमार वाळू उत्खननामुळे मेळगाव घाट मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच गाजला होता. यावर्षी या घाटाची लिलाव प्रक्रिया पार पडली असून, पहिल्याच दिवशी तब्बल वीस जेसीबी व दोनशे हायवा टिप्परच्या सहाय्याने बेसुमार वाळू उत्खनन करण्याचा सपाटा सुरु झाल्याचे दिसून आले. पुढील दिवसांतही अशाच पद्धतीने वाळू उत्खनन सुरु राहिल्यास या परिसरातील गोदावरी नदीचे पूर्ण पात्र खरबडून निघण्याची शक्यता असून, यामुळे पर्यावरण संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी आदेश असतानाही प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत.नायगाव तालुक्यातील मेळगाव वाळू धक्का यंदा लिलाव पद्धतीने सुटला आहे. मेळगाव येथील ठेकेदाराने लिलावात बोललेली रक्कम शासनाकडे भरल्याने नायगावच्या तहसीलदारांनी ७ मे रोजी या घाटाचा ताबा ठेकेदाराकडे दिला. वाळू ताबा घेतल्यापासूनच चार- पाच दिवसांतच गोदापात्रातील नदीतल्या नदीत दहा ते पंधरा जेसीबी मशीनच्या सहाय्याने गोदापात्रात आठ ते दहा फूट खड्डे खोदून दहा ते बारा फूट उंचीचे वाळूचे माळच उभे केले आहेत. सोमवारी या घाटाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, या ठिकाणी एक दोन नव्हे, तर तब्बल वीस जेसीबीच्या सहाय्याने वाळू उत्खनन करण्याचा सपाटा संबंधित ठेकेदाराने लावल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्यामुळे पाणीपातळीसह इतर पर्यावरणाच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. गतवर्षी केवळ चार हजार आठशे ब्रासची परवानगी असताना सुमारे तेरा ते पंधरा जेसीबीच्या सहाय्याने केवळ सहा दिवसांत १३,२०० ब्रास वाळू काढण्यात आली होती. यावरुन मोठ्या प्रमाणात तक्रारीही झाल्या होत्या.तक्रारीची दखल घेऊन गोदावरी नदीपात्रातील मोजमाप करून जास्तीचे उत्खनन झाल्याने गतवर्षीच्या लिलावधारकाला १ कोटी ६० लाख रुपयांचा दंड लावण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे, तेरा हजार ब्रॉस वाळू उपसा केल्याने शासकीय नियमानुसार ६ कोटी दंड वसूल करायला हवा होता. मात्र, प्रशासनाच्या बोटचेप्या धोरणामुळे येथे शासनाचा महसूल बुडाला. प्रशासनाने यावेळी तरी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़अधिकारी अनुपस्थित, सीसीटीव्हीही नाहीयंदा मेळगाव येथील या घाटावर मागील वर्षी प्रमाणेच बेसुमार उपसा करण्यात येत आहे. वाळू उत्खनन सकाळी ते संध्याकाळी सहा पर्यंतच करावे. त्या काळात सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. करण्यात येणारे उत्खनन मजूरांच्याच सहाय्याने करावे, केवळ तीन फुट खोल इतकेच उत्खनन करावे. या सह इतर प्रमुख अटी शासनाने घालून दिलेल्या आहेत. या अटींचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Nandedनांदेडsandवाळू