शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

१८ दांडीबहाद्दरांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:58 IST

यावेळी तब्बल १२ शिक्षक, विस्तार अधिकाऱ्यासह केंद्रप्रमुखही रजेविनाच गैरहजर असल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देउपाध्यक्षांच्या अचानक भेटी शिक्षकासह विस्तार अधिकारी गैरहजर

नांदेड : जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी शनिवारी वाई बाजार गटातील जिल्हा परिषद शाळांसह करंजी आरोग्य उपकेंद्राला अचानक भेटी दिल्या. यावेळी तब्बल १२ शिक्षक, विस्तार अधिकाऱ्यासह केंद्रप्रमुखही रजेविनाच गैरहजर असल्याचे आढळून आले. करंजी आरोग्य उपकेंद्रातही असाच प्रकार आढळून आल्याने १८ कर्मचाºयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कर्मचाºयांना आता याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिका-यांसमोर हजर व्हावे लागणार आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांबाबत सर्वसामान्य नागरिकांतून वारंवार तक्रारी येतात. या अनुषंगानेच उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गटशिक्षणाधिकाºयांसह इतर कर्मचाºयांना सोबत घेवून वाई बाजार गटातील जिल्हा परिषदेच्या लांजी व वाई बाजार शाळेला अचानक भेट दिल्या. या भेटीवेळी शाळेत विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. मात्र तब्बल १२ शिक्षकच शाळेत उपस्थित नसल्याचे आढळून आले. याबरोबरच एक विस्तार अधिकारी तसेच एक केंद्रप्रमुखही कर्तव्यावर हजर नव्हता.उपाध्यक्षांनी शाळेला भेट दिल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या कर्मचा-यांची एकच धावपळ उडाली. शिक्षकांचे हजेरीपत्रक मागविले असता त्यावर शिक्षकांच्या रजा नव्हत्या तसेच संबंधित शिक्षक शाळेतही उपस्थित नव्हते. या शाळेची पाहणी केल्यानंतर उपाध्यक्षांचा ताफा करंजी आरोग्य उपकेंद्राकडे वळला. या उपकेंद्रात व पशुसंवर्धन विकास विभागाच्या दवाखान्यातही डॉक्टर गैरहजर असल्याचे आढळून आल्याने उपाध्यक्षाच्या आदेशावरुन दोन्ही कार्यालयांना कुलूप ठोकून सील लावण्यात आले.शनिवार आणि त्यानंतर रविवार असल्याने अनेक कर्मचाºयांनी कार्यालयाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. करंजी उपकेंद्रातील ४ पैकी ३ कर्मचारी व पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी गैरहजर होते. गैरहजर शिक्षकांना गटशिक्षण अधिकाºयांमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याने जिल्हा परिषद कर्मचा-यांत खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद शाळेबरोबरच आरोग्य उपकेंद्राबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी असतात. या अनुषंगाने शनिवारी शाळेसह आरोग्य उपकेंद्राला अचानक भेट दिली असता कर्मचारी विनारजा गैरहजर असल्याचे आढळून आले. सदर कर्मचाºयांना नोटीस बजावण्यास सांगण्यात आले असून या कर्मचा-यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे याबाबत स्वत: भेटून खुलासा द्यावयाचा आहे.- समाधान जाधवउपाध्यक्ष, जिल्हा परिषद नांदेड

२९ शिक्षक गेले परीक्षेकरितानांदेड येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी माहूर तालुक्यातून २९ शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकारी गेल्याची माहितीही या भेटीवेळी उघड झाली. हा प्रकार पुढे आल्यानंतर उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी गटशिक्षणाधिकारी मसूद खान यांना याबाबत जाब विचारला. पेसाअंतर्गत क्षेत्रामधून इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांना कार्यमुक्त कसे केले ? अशी विचारणा करीत याबाबतही खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे.केंद्रप्रमुखांची व्हॉटस्अ‍ॅपवर रजा !अचानक भेटीवेळी लांजी जिल्हा परिषद शाळेतील ७ शिक्षक, वडसा येथील २ शिक्षक, असोली येथील दोघे तर वाई बाजारचे केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, आरोग्य उपकेंद्राचे तीन कर्मचारी आणि एक पशुधन विकास अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, वाईबाजार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्र प्रमुख व्ही.के.आचणे यांनी गटशिक्षणाधिकाºयांना व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या रजेचा अर्ज दिल्याचे सांगितले. दरम्यान, व्हॉटस्अ‍ॅपवरुन टाकलेली ही रजा नियमानुसार आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :NandedनांदेडTeacherशिक्षकNanded zpनांदेड जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी