शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड पोलीस भरती घोटाळ्यातील १६ आरोपी न्यायालयीन कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 19:04 IST

जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळा प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एसएसजी सॉफ्टवेअरच्या संचालकासह १६ जणांना अटक केली होती़ या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़.

नांदेड : जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळा प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एसएसजी सॉफ्टवेअरच्या संचालकासह १६ जणांना अटक केली होती़ या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ 

जिल्हा पोलीस दलाच्या १२ मार्च ते १ एप्रिल २०१८ या कालावधीत  ६९ शिपाईपदाची भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता़ खुद्द पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला होता़ त्यानंतर या प्रकरणात  पोकॉ नामदेव ढाकणे, एसएसजी सॉफ्टवेअरचे शिरीष अवधूत, स्वप्निल साळुंके यांच्यासह ओंकार संजय गुरव, शिवाजी श्रीकृष्ण चेके , आकाश दिलीप वाघमारे,सलीम महमद शेख , समाधान सुखदेव मस्के, किरणअप्पा मस्के , सुमित दिनकर शिंदे ,अब्दुल मुखीद मकसूद अब्दुल आणि संतोष माधवराव तनपुरे अशा बारा जणांना अटक केली होती़

त्यानंतर  कृष्णा जाधव रा़सावरखेडभोई ता़दे़राजा, हनुमान भिसाडे रा़ रिसोड जि़वाशिम व रामदास भालेराव रा़बहाद्दरपूरा ताक़ंधार या तिघांच्या मुसक्या आवळल्या होत्या़  त्यानंतर राज्य राखीव पोलिस दलाचा शुक्राचार्य टेकाळे यालाही पकडण्यात आले होते़ या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४६ लाख रुपये जप्त केले आहेत़ सोमवारी या सर्वांना न्या. सचदेवा यांनी न्यायालयीन कोठडीत पाठविले़ दरम्यान, या प्रकरणात पुणे पोलिसांतही गुन्हा नोंदविण्यात आला असून मंगळवारी आरोपींचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलिस नांदेडात येणार असल्याची माहिती हाती आली आहे़ 

२१ अनिधिकृत पोलीस उघड नांदेड पोलिस भरती घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरली असून त्यात हिंगोली येथील राज्य राखीव दलात गैरप्रकार करुन २१ उमेदवार पोलिस सेवेत कार्यरत असल्याचे उघड झाले आहे़ जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही ४ उमेदवार अशाच प्रकारे शासकीय सेवेत कार्यरत आहेत़ नांदेड पोलिसांच्या तपासात ही बाब उघडकीस आली असून याबाबत संबधित कार्यालयांना अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ 

टॅग्स :Crimeगुन्हाNanded policeनांदेड पोलीसfraudधोकेबाजीCourtन्यायालय