शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हदगाव तालुक्यात १४० डीपी नादुरुस्त,८० जळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:16 IST

तालुक्यातील ३३ केव्ही केंद्रातील जवळपास १४० रोहीत्र नादुरुस्त झाल्यामुळे विजेच्या समस्येने उग्र रूप धारण केले.८० रोहित्र जळाले आहेत. रोहीत्र नादुरुस्त असल्याने विहिरीत बोअरला पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके करपत आहेत़

ठळक मुद्देमागणी करुनही पाच वर्षांपासून डीपी मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : तालुक्यातील ३३ केव्ही केंद्रातील जवळपास १४० रोहीत्र नादुरुस्त झाल्यामुळे विजेच्या समस्येने उग्र रूप धारण केले.८० रोहित्र जळाले आहेत. रोहीत्र नादुरुस्त असल्याने विहिरीत बोअरला पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके करपत आहेत़तालुक्यात (१२) ३३ केव्ही विद्युत केंद्र आहेत़ तळणी, हदगाव, ल्याहरी, तामसा, मनाठा, बरडशेवाळा, निवघा, कोळी, लोहा-डिग्रस व घोगरी, आष्टी या ठिकाणी ही केंद्रे आहेत़ घरगुती व कृषीपंपाचे एकूण ३३ हजार ग्राहक आहेत़ हदगाव शहर ५ हजार ९००, ग्रामीण ४ हजार ५००, तळणी ३ हजार, आष्टी ३ हजार ५००, मनाठा ३ हजार ५००, तामसा ४ हजार, निवघा ४ हजार अशी ही संख्या आहे़तळणी-निवघा या बाजुला थ्रीफ्रेज विद्युत मिळतो़ लोडशेडींग सोडून तर तामसा, मनाठा, हदगाव शहर सिंगल फेज विद्युत भारनियमन सोडून मिळतो़ परंतु मागील पावसात, वादळामुळे सिंगल फेज व थ्री फेज मिळून १४० रोहीत्र नादुरुस्त झाले आहेत़८० रोहीत्र जळाले़ आता याची दुरुस्ती करून देणयाची जबाबदारी रोहीत्र पुरवठा करणाऱ्या एजन्सीची असते़ दोन वर्षाची गॅरंटी असते व या एजन्सी आपली कर्तव्य बजावतात़ परंतु या दुरुस्तीसाठी विद्युत केंद्रांनी त्यांना आॅईल पुरविणे बंधनकारक असते़ परंतु भोकर डिव्हीजनला आॅईलच उपलब्ध नसल्याने रोहीत्राची नादुरुस्ती रखडली व या संख्येतही वाढ झाली़ याबाबत तताडीने कार्यवाहीची मागणी होत आहे़

  • नवीन डीपीसाठी शेतकरी वर्गणी जमा करून कोटेशन भरतात़रोहीत्र मिळत नाही़ कधी तीन वर्ष तर कधी पाच वर्षाचा कालावधी लागतो़ तोपर्यंत शेतकरी थांबत नाहीत़ उपलब्ध डीपीवरच जोडणी घेतली जाते़ त्यामुळे भार वाढून रोहीत्र जळते. वाढीव तापमान हेही एक कारण असल्याचे सांगण्यात आले.

आष्टीकरांचे बावनकुळे यांना साकडेरोहीत्र जळाल्याने ताबडतोब मिळत नाही़ मागणीच्या तारखेपासून डीपी मिळतो़ आता पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने विजेचा भार वाढला़ त्यामुळे पूर्वीचे नादुरुस्त रोहीत्र दुरुस्त करून मिळावे म्हणून विभागावर दबाव येत आहे़लोकप्रतिनिधी यासाठी वरिष्ठ अधिका-यांना धारेवर धरत आहेत़ आ़नागेश पाटील यांनी वीज समस्या उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर घातली़ मंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वरिष्ठांशी संवाद साधला़

टॅग्स :Nandedनांदेडelectricityवीज