शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये ११२७ किलो गांजा जप्त, किंमत एवढे कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 06:47 IST

ट्रकमधून विशाखापट्टणम् येथून जळगाव जिल्ह्यात गांजाची वाहतूक करणार असल्याची टीप ‘एनसीबी’च्या मुंबई पथकास मिळाली. पथकाने या वाहनावर पाळत ठेवली होती.

ठळक मुद्देजप्त केलेल्या ११२७ किलो गांजाची किंमत अंदाजे  अकरा कोटींच्या आसपास असल्याचे पथक प्रमुख सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क गडगा  (नांदेड) : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (एनसीबी) मुंबई येथील पथकाने सोमवारी पहाटे नांदेड जिल्ह्यातील मांजरम येथे वाहन तपासणीत एक हजार १२७ किलो गांजा जप्त केला. ट्रकचालक आणि क्लीनरला एनसीबीतर्फे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, पथक मुख्य आरोपीचा शोध घेत आहे. या कारवाईमुळे आंध्र प्रदेशातून नांदेडमार्गे खान्देशात होणारी गांजा व अमली पदार्थांची तस्करी उघड झाली आहे.  

ट्रकमधून विशाखापट्टणम् येथून जळगाव जिल्ह्यात गांजाची वाहतूक करणार असल्याची टीप ‘एनसीबी’च्या मुंबई पथकास मिळाली. पथकाने या वाहनावर पाळत ठेवली होती. सोमवारी पहाटे देगलूरमार्गे नांदेडकडे जात असताना मांजरम गावाजवळ पथकाने हा ट्रक अडविला. त्यावेळी गांजाच्या २ व ५ किलोच्या ४३ गोण्या आढळून आल्या. विशेष म्हणजे गांजाची वाहतूक करणारा ट्रक हा जळगावचा असला तरी त्याचे पासिंग मात्र नांदेडचे आहे.जप्त केलेल्या ११२७ किलो गांजाची किंमत अंदाजे  अकरा कोटींच्या आसपास असल्याचे पथक प्रमुख सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोPoliceपोलिस