शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘अटल विश्वकर्मा योजनेत’ हिंगोली जिल्ह्यातील ११२२ कामगारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:11 IST

राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी सध्या विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. अभियानासाठी हिंगोली जिल्ह्यात तीन पथके नियुक्त केली असून ११२२ बांधकाम कामगारांची आतापर्यंत नोंदणी केल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी दिली.

ठळक मुद्देविशेष नोंदणी अभियान : ४ आॅगस्टपर्यंत मोहीम सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी सध्या विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. अभियानासाठी हिंगोली जिल्ह्यात तीन पथके नियुक्त केली असून ११२२ बांधकाम कामगारांची आतापर्यंत नोंदणी केल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी दिली.बांधकाम कामगार असूनही केवळ नोंदणी नसल्यामुळे शासनाच्या योजनांच्या लाभापासून कामगार वंचित राहातात. जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने राज्यभरात अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत संबंधित बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध २८ कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी विशेष नोंदणी अभियान सुरू केले आहे. ४ जुलैपासून हिंगोली जिल्ह्यात अभियान राबविले जात असून ४ आॅगस्ट २०१८ पर्यंत मोहीम सुरू राहणार आहे. १८ ते ६० वयोगटातील बांधकाम कामगारांची नोंदणी केली जात आहे. रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, नांदेड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यांमध्ये विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजनेद्वारे शैक्षणिक सहाय्य योजना, तसेच आर्थिक सहाय्य, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व अन्य योजनांचा लाभ दिला जातो. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना पहिली ते सातवी, ७५ टक्के उपस्थिती असल्यास प्रतिवर्षी अडीच हजार, आठवी ते दहावी पाच हजार, दहावी, बारावीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केल्यास १० हजारांचे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य केले जाते. २८ योजनांचा लाभ दिला जातो.---ंबांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रेगेल्या वर्षभरात ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नाव नोंदणीसाठी आवश्यक आहे. तसेच वयाचा दाखला, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह असलेले ओळखपत्र, बँक पासबुकची सत्यप्रत व पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्रे अशी कागदपत्र जोडून कामगार अधिकाऱ्यांच्या पथकाकडे ही कागदपत्रे जोडून द्यायची आहेत. दगडफोड कामगार, लादी किंवा फरशीची कामे करणारे कामगार, रंग व सुतारकाम, इलेक्ट्रिशियन व इतर कामे, नाले बांधणी प्लंबिंग, अग्निशमन यंत्रणेचे कामे, वातानुकूलितची कामे, सुरक्षा उपकरणांची कामे, जल संचयन व इतर कामे, काचेची कामे, सौरउर्जेशी निगडित कामे, धातूचे दरवाजे व खिडक्यांची कामे करणारे, विटांच्या कौलाची कामे, स्वयंपाक घरातील आधुनिक उपकरणांची कामे यासह विविध कामे करणाºया कामगारांचा यात समावेश आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीEmployeeकर्मचारी