शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

गाळेधारकांकडे थकले १ कोटी ३७ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:28 IST

सदर विषय ‘लोकमत’ ने मांडल्यानंतर याचे पडसाद सोमवारी झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत उमटले.

ठळक मुद्देबांधकाम समितीची बैठक जिल्हा परिषद मालमत्ता रक्षणासाठी ठोस भूमिका घेणार

नांदेड : व्यापारी गाळ्यांसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्वमालकीची मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा आहे. मात्र, या मालमत्तेचा हिशेबच ठेवला जात नसल्याने जिल्हा परिषदेच्या उत्पन्नावरही त्याचा गंभीर परिणाम दिसत होता. सदर विषय ‘लोकमत’ ने मांडल्यानंतर याचे पडसाद सोमवारी झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत उमटले. गाळेधारकांकडे १ कोटी ३७ लाख ९९ हजारांचे भाडे थकित असल्याची माहिती या बैठकीत कार्यकारी अभियंत्यांनी दिली. आता या वसुलीसह मालमत्तेसाठी जिल्हा परिषद ठोस भूमिका घेणार आहे.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी बांधकाम समितीची बैठक पार पडली. या बैठकीला जि. प. सदस्य संजय बेळगे, साहेबराव धनगे, दशरथ लोहबंदे, मधुकरराव राठोड यांच्यासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या व्यापारी गाळ्यांचे भाडे किती वसूल झाले आणि किती थकित आहे? हा प्रश्न मागील काही बैठकांत वारंवार उपस्थित होत होता. मात्र त्याचे समाधानकारक उत्तर संबंधित अधिकाºयांकडून मिळत नव्हते. दरम्यान, सोमवारच्या बैठकीत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुंडे यांनी थकबाकीचा तपशील उपाध्यक्षांकडे सादर केला. त्यानुसार १५ गाळेधारकांकडे तब्बल १ कोटी ३७ लाख ९९ हजार १२० रुपये थकित असल्याची माहिती पुढे आली. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या वतीने ठोस उपाययोजना करण्यात येणार आहे.दरम्यान, याच बैठकीत तरोडानाका येथील गट क्र. १२५ मधील जागेचा मुद्दा चर्चेत आला. २०१४ मध्ये झालेल्या चतु:सीमा मोजणीबाबत जिल्हा परिषद अनभिज्ञ असल्याचे सांगत या बांधकामासाठी जिल्हा परिषदेने कसलेही नाहरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावर महानगरपालिका आयुक्तांकडून बांधकामाची सर्व कागदपत्रे येत्या महिनाभरात मागवून यासंबंधीही ठोस निर्णय घेण्यासंबंधी चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या इमारतीत मोठ्या संख्येने कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या वायरिंगचे काम १९८३ मध्ये झालेले आहे. अनेक ठिकाणी ही वायर खराब झाली आहे. अनेकदा विजेसंदर्भात अडचणी निर्माण होतात. मात्र दुरुस्तीसाठी एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला नाही. विजेच्या अनुषंगाने काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्नही या बैठकीत उपस्थित झाल्यानंतर शासनाकडून नवीन व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत तात्पुरता कनिष्ठ अभियंता या सर्व कामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नियुक्त करावा, अशी मागणी सदस्यांनी केली.२०१३ मध्ये १२ लाख ५० हजार रुपये महावितरणला अदा करुन जिल्हा परिषदेत एक्स्प्रेस फिडर उभारण्यात आला. वीज खंडित होऊ नये हाच या मागचा उद्देश होता. मात्र त्यानंतरही वारंवार विजेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत असल्याने या संबंधीही तातडीने निर्णय घेण्याबाबत सदस्यांनी या बैठकीत आग्रह धरला. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी विशेष समिती स्थापन करावी. या समितीने जिल्हा परिषदेच्या सर्व मालमत्तेची पूर्ण माहिती संकलित करुन पुस्तिका करावी. यात न्यायालयीन खटल्याची माहिती सादर करावी, अशी मागणीही पुढे आली.किराया वसुलीवरुन टोलवाटोलवीजिल्हा परिषदेच्या व्यापारी गाळ्यांच्या किरायाची नियमित वसुली होणे आवश्यक आहे. मात्र या विषयावरुन जिल्हा परिषद प्रशासन आणि बांधकाम विभागात टोलवाटोलवी सुरु असल्याचे चित्र दिसून आले.बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार गाळ्यांचे भाडे किती आकारावे हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला आहे. मात्र किराया वसूल करुन तो जिल्हा परिषदेच्या खात्यात भरण्याचे काम प्रशासन विभागाचे आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी आल्यानंतर त्यांना आवगत करुन ठोस निर्णय घेण्यास सांगण्यात येणार आहे. याबरोबरच गाळे वसुलीतील अनियमिततेबाबतही चौकशीची मागणी होणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदTaxकर