शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

- तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार नागपूर जि.प.ची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:03 IST

महापालिकेच्या आमसभेला शासनाकडून परवानगी मिळाली, पण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला अजूनही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. जि.प. सभेसाठी सुरेश भट सभागृहाची मागणी केली आहे. सभागृह न मिळाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेण्याचा मानस जि.प. प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आमसभेला शासनाकडून परवानगी मिळाली, पण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला अजूनही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. जि.प. सभेसाठी सुरेश भट सभागृहाची मागणी केली आहे. सभागृह न मिळाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेण्याचा मानस जि.प. प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा आहे.जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन होऊन आज पाच महिने पूर्ण झाली आहेत. कोरोनामुळे जि.प.ची अर्थसंकल्पीय सभा होऊ शकली नाही. त्याचबरोबर दर तीन महिन्यांनी होणारी सर्वसाधारण सभाही घेता आली नाही. अर्थसंकल्प सीईओंनी मंजूर केला असला तरी, सभेची मंजुरी नसल्याने निधी खर्च करता येत नसल्याने विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे जि.प.ने सभा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरी मागितली आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेतला नाही. जि.प.ची सभा नेहमी खेडकर सभागृहात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभागृहात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सभा घेणे शक्य नाही. सोबतच महाराष्ट्र जि.प. व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १११ नुसार सर्वसाधारण सभाही घेणे आवश्यक आहे. जूनच्या अखेरीसपर्यंत सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जि.प.कडून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सभा रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात घ्यावयाची असल्याने त्यासाठी मनपा आयुक्तांनी सभागृह उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती जि.प.कडून आयुक्तांना केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास, पण सभागृह उपलब्ध न झाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेण्याचा पर्याय पुढे आला आहे.अशी राहील अरेंजमेंटव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेसाठी सर्व पदाधिकारी व अधिकारी मुख्यालयात बसतील. प्रत्येक पंचायत समितीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय केली जाईल. तिथे पंचायत समिती अंतर्गत येणारे जि.प. सदस्य बसतील. सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपले प्रश्न प्रशासनापुढे मांडतील. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही, असे जि.प.च्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर