शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक हिवाळी अधिवेशनानंतरच    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:53 IST

राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी निवडणुका या हिवाळी अधिवेशानानंतर होतील, अशी शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील जिल्हा परिषदांच्यानिवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी निवडणुका या हिवाळी अधिवेशानानंतर होतील, अशी शक्यता आहे.नागपूरसह धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार २ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून ११ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. आयोगाने विधानसभा निवडणुकीची मतदार यादीच ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे निवडणूक विभागाला नव्याने यादी करण्याची गरज नाही. परंतु यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु आहे. त्याचा निकाल येत्या ७ तारखेला लागणार आहे. न्यायालय काय निकाल देते त्याकडे लक्ष लागले आहे. न्यायालयाने आयोगाच्या बाजूने निकाल दिला तरी. एकूणच निवडणूक प्रक्रिया राबवण्यासंदर्भात विचार केला तरी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता नाही. डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. त्या दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता नाही. तेव्हा हिवाळी अधिवेशन संपल्यावरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, असे सांगितले जात आहे. सव्वा दोन ते अडीच वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर राज्य शासनाने नागपूर जिल्हा परिषदेतील दोन ग्रामपंचायतींचा दर्जा वाढवला. त्यामुळे या ग्रामपंचायती वगळाव्या लागल्याने निवडणुका घेता आल्या नाही. शासनाने जिल्हा परिषदेला मुदतवाढ दिली. दुसऱ्या कार्यक्रमाच्या वेळीही एका ग्रामपंचायतीचा दर्जा उंचावण्यात आला. त्याच प्रमाणे आरक्षण ५० टक्क्यांच्यावर गेल्याने नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. राज्य शासनाने आरक्षणाबाबत कोणातही निर्णय घेतला नाही. यामुळे वाशिम, अकोला, नंदूरबार, धुळे जिल्हा परिषदांनाही मुदतवाढ मिळाली. दरम्यान आयोगाने पुन्हा कार्यक्रम जाहीर केला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालच्या भीतीने सर्व जिल्हा परिषदा बरखास्त करून प्रशासकाची नियक्ती करण्यात आली. अशाप्रकारे सर्व जिल्हा परिषदांना जवळपास सव्वा दोन ते अडीच वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक