शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज होणार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 22:23 IST

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे, प्रशासनाने आठवड्याभराचे लॉकडाऊन केले. हे लॉकडाऊन वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे, प्रशासनाने आठवड्याभराचे लॉकडाऊन केले. हे लॉकडाऊन वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेतील कोरोनाबाधितांची संख्या ३० वर पोहचली आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा परिषद आठवडाभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रसार माध्यमांशी केलेल्या चर्चेत प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कुंभेजकर म्हणाले, सर्व तालुक्यांवरील यंत्रणा सजग आहे. जिल्हा परिषदेतील आरोग्य आणि सामान्य प्रशासन विभागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. या आठवड्यात बुधवारी महालक्ष्मी पूजनाची सुटी होतीच त्यामुळे इतर चार दिवस वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेण्यात आला. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी आरोग्य विभागाचे कामकाज सुरूच आहे. तसेच गरजेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावले जात आहे.हा लॉकडाऊन पुढे वाढविणार का तसेच जिल्हा परिषद सुरू झाल्यानंतर कर्मचारी उपस्थितीत कपात होणार का याबाबत विचारले असता ते म्हणाले, लॉकडाऊन हा अंतिम उपाय नाही. जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा फार काळ बंद ठेवणे व्यवहार्य नाही. मात्र लॉकडाऊन वाढविणे आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करणे हे निर्णय परिस्थितीनुसार घेतले जातील. तूर्तास केवळ अत्यावश्यक सेवांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर