शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

महाविकास आघाडीचा प्रयोग नागपूर जिल्हा परिषदेतही होणार ! निवडणुका मात्र स्वबळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 21:17 IST

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीतही सुद्धा महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याचे चिन्ह आहे. पण स्थानिक नेत्यांच्या मते हा प्रयोग सत्ता स्थापनेसाठी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देभाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी फॉर्म्युला वापरणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत आहे. संपूर्ण देशभरात महाराष्ट्राने राबविलेला या पॅटर्नची चर्चा होत आहे. सत्तेच्या या नवीन प्रयोगामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. याचे परिणाम यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही होण्याचे संकेत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीतही सुद्धा महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याचे चिन्ह आहे. पण स्थानिक नेत्यांच्या मते हा प्रयोग सत्ता स्थापनेसाठी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने २०१२ मध्ये महाआघाडीचा प्रयोग राबवून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. तेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या २२ जागा निवडून आल्या होत्या तर काँग्रेसचे १९ सदस्य निवडून आले होते. पण त्यावेळी भाजपाने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी, शिवसेना व गोंडवाना गणतंत्र पक्षाला सोबत घेऊन महाआघाडी बनविली होती. त्यामुळे भाजपाला अध्यक्षपद तर राष्ट्रवादीला उपाध्यक्ष व शिक्षण सभापतिपद दिले होते. शिवसेनेला महिला व बालकल्याण आणि कृषी सभापती व गोंगपाला समाजकल्याण सभापतिपद दिले होते. पण धोरणात्मक निर्णय घेताना, दोघांमध्ये झालेल्या फाटाफुटीने अडीच वर्षानंतर राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर पडली.२०१२ मध्ये महाआघाडीचा प्रयोग भाजपाने केला होता. पण यंदा हा प्रयोग करण्यासाठी जिल्ह्यात शिवसेना उत्सुक आहे. भाजपाला दूर ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास आपण दोन पाऊल पुढे येऊन जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करू असे शिवसेनेचे बडे नेते सांगत आहे. पण निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना तयार आहे. नुकताच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आढावा माजी मंत्री संजय राठोड यांनी घेतला. त्यात सर्वच सर्कलमध्ये शिवसेना लढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बड्या नेत्यांकडून सांगण्यात येते की, निवडणुकीपूर्वी हे सूत्र न जुळल्यास निवडणूक निकालानंतर अशाप्रकारची जुळवाजुळव शक्य आहे. काँग्रेस सुद्धा याच मानसिकतेत आहे. कारण निवडणुकीपूर्वी महाआघाडी झाल्यास मोठ्या प्रमाणात फाटाफूट होऊ शकते. रामटेकमध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. काटोल, हिंगणामध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी हमखास हा प्रयोग करण्यात येईल, असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठका जोरात सुरू आहे. पदाधिकाऱ्यांचे मेळावे व विविध शिबिर घेतले जात आहे. सर्वच जागेवर लढण्यासाठी तयार राहा, असे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.हो, हा फॉर्म्युला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राबविला जाईल. निवडणुका लढण्याअगोदर तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. दोन पाऊल मागे घेण्याला कुठल्याच पक्षातील पदाधिकाऱ्याला हरकत नसावी. निवडणुकीपूर्वी आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी यासंदर्भात विचार विनिमय करू.बाबा गुजर, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसराज्यात झालेल्या महा विकास आघाडीचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निश्चितपणे परिणाम दिसतील. निवडणुकीपूर्वी हा प्रयोग राबविताना कार्यकर्त्यांनाही विचारात घेतले जाईल. कारण कार्यकर्ते पाच वर्ष मतदार संघात काम करतात. कार्यकर्त्यांची इच्छा जाणून घेऊन निर्णय घेऊ. पण निवडणूक झाल्यानंतर निश्चित हा प्रयोग अंमलात आणू.संदीप इटकेलवार, जिल्हा प्रमुख, शिवसेनाभाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची चिंता वाढलीनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने काटोल, रामटेक, उमरेड, सावनेर या जागा गमाविल्या आहे. दुसरीकडे राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे भाजपाला निवडणुकीत संपूर्ण ताकद लावावी लागणार आहे. २०१२ च्या आकड्यावरच भाजपा स्थिरावल्यास, त्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक भाजपासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.आमच्या पक्षामध्ये हा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून निर्देश आल्यानंतर घेतला जातो. पण आम्ही प्रत्येक तालुक्याचा आढावा घेत असताना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर हा अजेंडा मांडत आहोत. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातून अभिप्राय आल्यानंतर ते वरिष्ठांना कळविण्यात येतील. ते सांगतील त्या निर्णयावर आम्ही वाटचाल करू.राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरElectionनिवडणूकPoliticsराजकारण