शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
4
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
5
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
6
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
7
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
8
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
9
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
10
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
11
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
12
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
13
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
14
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
15
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
16
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
17
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
18
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
20
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?

‘झिरो माईल’ संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:51 AM

स्मार्ट सिटी म्हणून नागपूरचा विकास होत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु शहराला स्मार्ट करीत असतानाच शहरातील ऐतिहासिक वास्तू मात्र दुर्लक्षित होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

ठळक मुद्देकसा जपणार ऐतिहासिक वारसा : मुख्य दगडाला पडल्या भेगा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी म्हणून नागपूरचा विकास होत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु शहराला स्मार्ट करीत असतानाच शहरातील ऐतिहासिक वास्तू मात्र दुर्लक्षित होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. याच दुर्लक्षामुळे नागपूरची ओळख असलेल्या झिरो माईलची सध्या दुर्दशा झालेली आहे.झिरो माईलचे चिन्हांकन नागपुरात असल्यामुळे, हे शहर भारताचा केंद्रब्ािंदू आहे. हे चिन्हांकन भारताच्या मध्यवर्ती बिंदूचे चिन्ह आहे. अंतर मोजण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी येथे झिरो माईल स्टोन उभारला होता. या झिरो माईल स्टोनचे स्वरूप चार घोडे आणि एक स्तंभ असे आहे. ते वाळूच्या दगडांनी बनलेले आहे. विधानभवनाच्या नैऋत्येकडे ते आहे. नागपूर हे भारताचे मध्यवर्ती शहर आहे, असे समजून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हे ठिकाण निश्चित केले आणि तिथे झिरो माईल स्टोन उभारला.हे शहर देशाचे मध्यवर्ती शहर असल्याने नागपूरला दुसरे राजधानीचे शहर करण्याचीही त्यांची योजना होती. झिरो माईलवरील नोंदीनुसार ते १९०७ मध्ये उभारण्यात आलेले आहे. येथून हैदराबाद, सिवनी, जबलपूर, रायपूर हे अंतर माईलनुसार नोंदविण्यात आलेले आहे. झिरो माईल हे शहराचीच नव्हे तर देशाची एक ओळख आहे. त्यामुळे ते पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठिकाण आहे. प्रशासनातर्फे या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले होते. परंतु त्याला आता कित्येक वर्षे लोटली आहे. सौंदर्यीकरण करताना येथे चार घोडे उभारण्यात आले होते. त्या घोड्यांचे पाय आता तुटले आहेत. त्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. सुरक्षा भिंतीलाही तडे गेले आहेत. सौंदर्यीकरण करण्यात आलेली बाग कधीचीच सुकली आहे. इतकेच नव्हे तर झिरो माईल स्टोनच आता धोक्यात आला आहे.मेट्रो रेल्वे अंतर्गत होणार सौंदर्यीकरण‘झिरो माईल’च्या देखभाल दुरुस्तीचे काम अगोदर नागपूर सुधार प्रन्यासकडे होते. मध्यंतरी राज्य शासनाने सुद्धा याच्या विकासाची योजना आखली होती परंतु दरम्यानच्या काळात नागपूरमध्ये मेट्रो रेल्वेची योजना आली. मेट्रोचे काम सध्या जोरात सुरू आहे. मेट्रो रेल्वेसोबतच झिरो माईलच्याही विकासाची योजना आहे. यासाठी झिरो माईल हे मेट्रो स्टेशन राहणार आहे. हे स्टेशन शहरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे. यासोबतच हेरिटेज वॉकसह एकूणच झिरो माईलच्या परिसराचा अत्याधुनिक विकास करण्याची योजना आहे, असे अधिकृत सूत्रांकडून सांगितले जाते. परंतु ही योजना सुरू होईल तेव्हा होईल आज मात्र झिरो माईलचे स्मारक (स्टोन) धोक्यात आहे. ते वाचवणार कोण व कसे, हा मुख्य प्रश्न आहे.तक्रार आल्यास निर्देश देणारजिल्हा हेरिटेज कमिटीकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नाही. परंतु एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या दुरावस्थेबाबत काही तक्रार असेल तर निश्चितच समितीच्या बैठकीत त्यासंबंधीची दखल घेऊन संबंधित संस्थेला त्याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले जातील.- सुप्रिया थूल , सदस्य सचिव,जिल्हा हेरिटेज समिती.