शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर भागात पैशाच्या वादातून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:03 IST

व्याजाने घेतलेली रक्कम परत मागण्याचा तगादा लावणाऱ्या तरुणाला ‘बर्थ डे पार्टी’चे निमित्त सांगून बोलावण्यात आले. पण पार्टी न करताच त्याच्याशी भांडण उकरून काढत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याला शाळेच्या स्वच्छतागृहात बंद करून आरोपींनी पळ काढला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडखैरी येथे शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देतिन्ही आरोपी पसार : गोंडखैरी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्याजाने घेतलेली रक्कम परत मागण्याचा तगादा लावणाऱ्या तरुणाला ‘बर्थ डे पार्टी’चे निमित्त सांगून बोलावण्यात आले. पण पार्टी न करताच त्याच्याशी भांडण उकरून काढत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याला शाळेच्या स्वच्छतागृहात बंद करून आरोपींनी पळ काढला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडखैरी येथे शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.नंदकिशोर दिनेश भोसले (२१, रा. गोंडखैरी बरड, ता. कळमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव असून, आरोपींमध्ये प्रताप ऊर्फ चुन्नी, अश्विन रामकृष्ण मारवाडी व बाल्या तिघेही रा. गोंडखैरी (बरड), ता. कळमेश्वर या तिघांचा समावेश आहे. प्रतापने नंदकिशोरकडून वर्षभरापूर्वी १७ हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. नंदकिशोरने काही दिवसांपासून प्रतापकडे या रकमेची मागणी केली होती. प्रतापला रक्कम परत करण्याची इच्छा नसल्याने त्याने नंदकिशोरचा काटा काढण्याची योजना आखली.या चौघांपैकी कुणाचाही शुक्रवारी वाढदिवस नसताना प्रतापने नंदकिशोरला रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास ‘बर्थ डे पार्टी’साठी गोंडखैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानावर बोलावले. तो शाळेच्या मैदानावर पोहोचताच तिघांनीही त्याच्याशी भांडण उकरून काढत मारहाण करायला सुरुवात केली. शिवाय, तिघांनीही त्याच्या डोके, पोट, पाठ व कानशीलावर धारदार शस्त्राने वार केले. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मृतदेह पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने शाळेच्या स्वच्छतागृहात नेला आणि तिघांनीही पळ काढला.नंदकिशोर रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने घरच्या मंडळींनी त्याचा शोध घेतला. सकाळी त्याचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात आढळून येताच पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी नेहा दिनेश भोसले (१८) हिच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध भादंवि ३०२, २०१, १२० (ब) अन्वये गुन्हा नोंदविला या घटनेचा तपास ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे करीत आहेत.शोधपथक रवानानंदकिशोरच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी दोन शोधपथक तयार करण्यात आले असून, ते रवाना करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी तथा ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी दिली. आरोपींची संख्या तीनपेक्षा अधिक असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणात पोलिसांनी फिर्यादीने सांगितलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी पोलिसांना काहीही आढळून आले नाही. त्यामुळे तिथे पार्टीचे आयोजन करण्यात आले नसल्याचेही स्पष्ट होते. आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर