शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशभर सायकलने फिरत शाकाहाराचा संदेश देण्याचा तरुणाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 10:41 IST

रोहित इंगळे हे नाव नागपूर शहरासाठी अनोळखी आहे. परंतु रोहित आॅक्टोबर २०१७ पासून वॅगन इंडिया मुव्हमेंट मिशनला घेऊन देशभरात सायकलने फिरत आहेत.

ठळक मुद्दे७५०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण हॉटेलची नोकरी सोडून रोहितचे कार्य

ललिता टाटा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोहित इंगळे हे नाव नागपूर शहरासाठी अनोळखी आहे. परंतु रोहित आॅक्टोबर २०१७ पासून वॅगन इंडिया मुव्हमेंट मिशनला घेऊन देशभरात सायकलने फिरत आहेत. देशात शाकाहाराचा संदेश देण्याचे कार्य ते करीत आहेत. नागरिकांनी मांसाहार सोडून शाकाहार सुरु करावा यासाठी ते आपल्या अभियानातून जनजागृती करीत आहेत.रोहित इंगळे यांनी आतापर्यंत ७५०० किलोमीटरचे अंतर कापून ते नागपुरात पोहोचले. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपल्या अभियानाशी निगडित अनुभव सांगितले. आपण हे अभियान का सुरू केले हेसुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. रोहितने सांगितले, ते दुबईत एका हॉटेलमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होते. दरम्यान त्यांनी एक लेख वाचला. या लेखात ‘वॅगन’ हा शब्द वाचला. या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी त्यांनी पूर्ण लेख वाचला. या लेखात एक ओळ अशी होती की जर तुम्ही प्राण्यांवर प्रेम करीत असाल तर मांस खाऊ नका. ही ओळ वाचल्यानंतर ही ओळ खरी असल्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्या दिवसापासून त्यांनी मांस खाणे बंद केले. एवढेच नव्हे तर शाकाहाराप्रति नागरिकांमध्ये जागृती करणे गरजेचे असल्याचा विचार त्यांच्या मनात आला. या विचारातून ते नोकरी सोडून मुंबईला आपल्या घरी परतले. तेथे एक गट तयार केला. पशुंना वाचविण्याच्या दिशेने त्यांनी काम सुरू केले. काही वर्षानंतर हा प्रयत्न कमी असल्याचे त्यांना वाटले. अशा प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींबाबत त्यांनी पुस्तकातून वाचन सुरू केले.एका पुस्तकात आॅस्ट्रेलियात एका व्यक्तीबाबत त्यांनी वाचले. त्यांनी ५ हजार किलोमीटरचे अंतर कापून जनजागृती केली होती. त्या पासून रोहितला प्रेरणा मिळाली. रोहितने सांगितले की, त्यांनी सायकलवर फिरून देशभरात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आधी खूप तयारी केली.

या राज्यांमध्ये दिला संदेशप्रवास सुरू केल्यानंतर रोहितने आजपर्यंत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू व काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड राज्यात जनजागृती केली. तेथून ते नागपुरात पोहोचले. नागपूरात व्हीजन नावाचा ग्रुप तयार केला आहे. यापुढे दक्षिणेकडील राज्यात जाण्याचा मनोदय रोहितने व्यक्त केला.

 

टॅग्स :Socialसामाजिक