युवकांना मिळणार स्वयंरोजगाराची दिशा

By Admin | Published: January 28, 2015 01:07 AM2015-01-28T01:07:26+5:302015-01-28T01:07:26+5:30

विदर्भात शिक्षित, अनुभवी व क्षमतावान युवकांची कमतरता नाही. मात्र, त्यांचा योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. यातून बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे

Youth will get self-employment direction | युवकांना मिळणार स्वयंरोजगाराची दिशा

युवकांना मिळणार स्वयंरोजगाराची दिशा

googlenewsNext

‘युथ एम्पॉवरमेंट समिट’ ३१ पासून : उद्यमशील मार्गदर्शनाचा जागर
नागपूर : विदर्भात शिक्षित, अनुभवी व क्षमतावान युवकांची कमतरता नाही. मात्र, त्यांचा योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. यातून बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. नोकरी व स्वयंरोजगारासाठी युवकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशन’ ची स्थापना करण्यात आली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत मानकापूर येथील क्रीडा संकुलात ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’ आयोजित करण्यात आली असून येथे युवकांना तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे.
फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी महापौर आ. अनिल सोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या परिषदेत युवकांना स्वयंरोजगाराकडे वळविण्यासाठी धडे दिले जातील. नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कार्पोरेशन, मिहान, उच्च शिक्षण क्रीडा व युवक कल्याण विभाग, सामाजिक न्याय विभाग, पर्यटन व उद्योग विभागाचे यासाठी सहकार्य मिळाले आहे. विदर्भातील युवक स्वत:चा रोजगार तयार करू शकतात. त्यांच्यात तेवढी क्षमता आहे. शासनाचे असे अनेक विभाग आहेत की जे युवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करतात. मात्र, युवकांना याची माहिती नाही. फाऊंडेशनतर्फे अशा योजनांची माहिती युवकांना करून दिली जाईल.
या परिषदेसाठी कुठलेही प्रवेश शुल्क नाही. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला परिषदेच्या स्थळी नोंदणी करता येईल. याशिवाय ६६६. ५्रंि१ुाँंङ्म४ल्लंि३्रङ्मल्ल.ङ्म१ॅ या वेबसाईटवरही आॅनलाईन नोंदणी करता येईल. या परिषदेत सहभागी होण्यासाठी जवळपास सर्वच महाविद्यालयांशी संपर्क साधण्यात आला आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी राहतील. विशेष अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. समारोप २ फेब्रुवारी रोजी होईल. या वेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, आदिवासी विकास अंबरीश राजे आत्राम, मध्यप्रदेशचे शिक्षण मंत्री उमाशंकर गुप्ता उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेत माजी उपमहापौर संदीप जाधव, सुनील अग्रवाल, संजय बोंडे, चैतन्य मोहाडीकर, नवनीत सिंह तुली आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तज्ज्ञ देतील टिप्स
परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्या अनुभवांच्या आधारे युवकांना यशस्वीतेच्या टिप्स देतील. एन.सी. शायना, सुनील मानसिंहका, डॉ. संजय मोघे, अंशुमन सिंह, विजयकुमार गौतम, डॉ. पी.पी. पाटील, गजानन डांगे, जयश्री फडणवीस, भाऊराव तुमसरे, आ. सुभाष देशमुख, दिनेश ओवुळकर, संजय जाधव, डॉ. प्रकाश मालगावे, संजय नाथे, एम.व्ही. राव, सचिन बुरघाटे, बबलू चौधरी, जयसिंग चव्हाण आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
कंपन्यांशी साधणार संपर्क
परिषदेत नोंदणी केलेल्या युवकांची एक ‘डाटा बँक’ तयार केली जाईल. कोणत्या क्षेत्रात काम करण्यासाठी किती युवक उपलब्ध आहेत, याची माहिती फाऊंडेशनकडे उपलब्ध असेल. भविष्यात एखाद्या कंपनीला कुशल मनुष्यबळाची गरज भासली तर विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशन संबंधित कंपनीशी संपर्क साधेल व आपल्याकडे उपलब्ध असलेल्या युवकांची यादी सोपवून त्यांना प्रथम मुलाखत संधी देण्याची विनंती करेल. यामुळे विदर्भातील रोजगाराच्या संधी वाढतील.

Web Title: Youth will get self-employment direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.