शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीकच्या खापरखेड्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:40 IST

जुन्या वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा - कोराडी मार्गावरील राजबाबा बियर बारच्यासमोश शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकोराडी मार्गावरील राजबाबा बियर बारसमोरील थरारमृत आणि आरोपी सराईत गुन्हेगार

आॅनलाईन लोकमतनागपूर : जुन्या वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा - कोराडी मार्गावरील राजबाबा बियर बारच्यासमोश शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत तरुण हा एका खुनातील आरोपी असून, त्याच्यावर गोळ्या झाडणारा आरोपीदेखील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.आकाश पानपत्ते (२७, रा. वॉर्ड क्रमांक - १, खापरखेडा, ता. सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश हा त्याच्या मित्रांसोबत खापरखेडा - कोराडी मार्गावरील राजबाबा बियर बारमध्ये बसला होता. तो रात्री ८ वाजताच्या सुमारास बारमधून बाहेर पडताच आरोपीने त्याच्या डोक्यावर तब्बल तीन गोळ्या झाडल्या आणि तिथून लगेच पळून गेला. आकाशचा मित्र नीलेश डेहरिया याने आकाशला लगेच खापरखेडा येथील डॉ. पवार यांच्या हॉस्पिटन्लमध्ये नेले. डॉ. पवार यांच्या सूचनेवरून त्याला मानकापूर (नागपूर) येथील अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. हा प्रकार बारच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.आकाशवर सूरज कावळे, रा. वॉर्ड क्रमांक - २, खापरखेडा, ता. सावनेर याने गोळ्या झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी वेकोलिच्या सिल्लेवाडा येथील कार्यालयात मेहताब खान याचा खून करण्यात आला होता. आकाश हा मेहताब खान याच्या खुनातील एक आरोपी होती. आकाशचा खून मेहताबच्या समर्थकांनी केला असावा, असा संशय व्यक्त केला जात असून, पोलीस त्याही दिशेने तपास करीत आहेत. सूरज कावळे याच्याकडे संशयित म्हणून बघितले जात असून, तोही सराईत गुन्हेगार असल्याची तसेच त्याचे आकाशसोबत जुने वैमनस्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर