शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील तरुणाचा बडनेऱ्यात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:28 IST

अमरावतीवरून रेल्वेने परत येत असलेल्या नागपुरातील एका युवकाचा खाली पडून मृत्यू झाला. सौरभ खोब्रागडे (३०) रा. वंजारी नगर असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर घडली. या प्रकरणी बडनेरा लोहमार्ग पोलिसांनी नोंद केली.

ठळक मुद्देरेल्वे आऊटरवर आढळला मृतावस्थेत मोबाईलवरून पटली ओळख

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावतीवरून रेल्वेने परत येत असलेल्या नागपुरातील एका युवकाचा खाली पडून मृत्यू झाला. सौरभ खोब्रागडे (३०) रा. वंजारी नगर असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर घडली. या प्रकरणी बडनेरा लोहमार्ग पोलिसांनी नोंद केली. अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बुधवारी कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार केले.सौरभचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले. त्याला पत्नी सुकेशनी आणि दोन वर्षाची मुलगी अबोली आहे. तो आईवडिलांसह वंजारीनगरात राहात होता. मागील आठ दिवसांपूर्वीच तो अमरावतीला कामानिमित्त गेला होता. काम आटोपून मंगळवारी नागपूरला परत येत होता. सायंकाळच्या सुमारास सौरभ बडनेरा रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर कि.मी. ६६३/३४ जवळ मृतावस्थेत पडून होता. नागपूरला जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या लोकोपायलटने या घटनेची माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांना दिली. त्यांच्याकडून लोहमार्ग पोलीसचे हेड कॉन्स्टेबल प्रभाकर कांबळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सुरुवातीला त्याची ओळख पटली नाही. त्याच्या जवळ मिळालेल्या मोबाईलवरून ओळख पटली. कांबळे यांनी बंद असलेल्या मोबाईलला सुरू करून त्यातील नंबरवर संपर्क साधला तसेच या घटनेची माहिती दिली.फोनवर सांगितले घरी येतोयसौरभचे मामा सेवानिवृत्त माहिती अधिकारी नरेश मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार तो कामानिमित्त अमरावतीला गेला होता. सौरभने दुपारच्या सुमारास सुरेश मेश्राम (मामा) यांना फोन केला होता. रेल्वे तिकीट घेतले असून घरी येत असल्याचे तो म्हणाला. घरी सारेच त्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, काळाने त्याच्यावर झडप घातली.

टॅग्स :Deathमृत्यूBadneraबडनेरा