शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भर बाजारात तरुणाची हत्या  : तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 01:19 IST

उधारीच्या पैशातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान तिघांनी एका तरुणाची हत्या करण्यात झाले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवारी बाजारात मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देउधारीच्या पैशाचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उधारीच्या पैशातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान तिघांनी एका तरुणाची हत्या करण्यात झाले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवारी बाजारात मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.सुभाष हरिश्चंद्र माहुर्ले (वय २३) असे मृताचे नाव आहे. तो शिवाजीनगर, कोतवालीत राहत होता. सुभाषचे मामा भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. सुभाष मामांसोबत काम करायचा. काही दिवसांपूर्वी सुभाषने आरोपी भट्टी ऊर्फ खुशाल प्रभाकर राजूरकर (वय २६, रा. रामबाग) याला उधार रक्कम दिली होती. त्याबदल्यात भट्टीची मोटरसायकल त्याने गहाण ठेवली होती. महिनाभरापूर्वी भट्टीने २० हजार रुपये देऊन आपली मोटरसायकल सुभाषकडून परत नेली. यावेळी १० हजार रुपयांचा हिशेब शिल्लक राहिल्याचे सांगून सुभाष वारंवार भट्टीला पैसे मागत होता. मंगळवारी याच कारणावरून फोनवर त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे संतप्त आरोपी भट्टी तसेच त्याचे साथीदार अभय कमलेश फुसाटे (वय २०, रा. रामबाग) आणि अतुल घोष (रा. इमामवाडा) सायंकाळी सुभाषकडे आले. त्यांनी आधी सुभाषला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नंतर चाकूचे सपासप घाव घालून सुभाषला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी बाजारात शेकडो महिला-पुरुष होते. त्यामुळे बाजारात प्रचंड दहशत निर्माण झाली. आरोपींनी सुभाषला ठार मारल्यानंतर शिवीगाळ करीत तेथून पळ काढला.गुन्हे शाखेने पकडले आरोपीया थरारक घटनेची माहिती कळताच सदर पोलीस ठाण्यातील ताफा आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक तेथे पोहचले. आरोपींची नावे कळताच गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धावपळ करून बाहेर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या मुसक्या बांधल्या. त्यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना सदर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून