शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बालगुन्हेगारांनी केली युवकाची हत्या : नागपूर एमआयडीसीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:49 IST

क्षुल्लक वादातून बालगुन्हेगारांनी साथीदारांच्या मदतीने एका युवकाची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री राजीवनगर टेकडी एमआयडीसी येथे घडली.

ठळक मुद्देगुन्हेगारांच्या साथीदारासही अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षुल्लक वादातून बालगुन्हेगारांनी साथीदारांच्या मदतीने एका युवकाची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री राजीवनगर टेकडी एमआयडीसी येथे घडली. पोलिसांनी या हत्येचे सूत्रधार दोन अल्पवयीन आणि त्याचा साथीदार गणेश ऊर्फ कऱ्या विक्की दांडेकर (२४) रा. गिट्टीखदान याला अटक केली आहे. संदीप हिराचंद बावनकर (२४) रा. राजीवनगर असे मृताचे नाव आहे.संदीप खासगी कंपनीत काम करीत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी आहेत. संदीपला कही दिवसांपासून मिरगी येत होती. यामुळे त्याने काम सोडले होते. या खुनाचे सूत्रधार दोन बालगुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही खून आणि इतर गुन्हे दाखल आहेत. दुसरा अल्पवयीन सुद्धा घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी आहे. काही दिवसांपूर्वी घरफोडी करणाऱ्या बालगुन्हेगारासोबत संदीपचा वाद झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार संदीप आपल्या गर्लफ्रेण्ड्ससोबत बाईकने जात होता. त्याचवेळी आरोपीने तिला पाहून टोमणा मारला. संदीपने त्याला फटकारत समज दिली. यामुळे आरोपीला प्रचंड राग आला. त्याने संदीपचा बदला घेण्याचे ठरवले. त्याने ही गोष्ट आपल्या दुसऱ्या अल्पवयीन साथीदारास सांगितली.मंगळवारी संदीपचा मित्र प्रणयचा वाढदिवस होता. यात संदीप आणि त्याचे इतर मित्रही गेले होते. जिथे वाढदिवस साजरा केला जात होता. त्याच्या समोरूनच आरोपी जात होता. कुठल्या तरी गोष्टीवरून संदीप आणि त्याच्या मित्रांशी वाद झाला. यामुळे त्याला आणखीनच राग आला. तो त्याचा दुसरा अल्पवयीन साथीदार, गणेश दांडेकर व इतर साथीदार काही वेळानंतर पुन्हा तिथे आले. संदीप त्यांना सापडला. ते संदीपला वाद सोडवण्याच्या बहाण्याने गळ्यात हात टाकून राजीवनगरच्या टेकडीवर घेऊन गेले. तिथे त्याला मारहाण केली व दगडाने ठेचून त्याची हत्या केली. यानंतर आरोपी फरार झाले. खूप वेळ होऊनही संदीप परत न आल्याने त्याचे साथीदार चिंतेत पडले. ते टेकडी परिसरात गेले. तेव्हा त्यांना हत्या झाल्याचे समजले. त्यांनी एमआयडीसी पोलिसांनी सूचना दिली. तसेच संदीपला रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.एमआयडीसी पोलीस आरोपीच्या शोधात निघाले. तेव्हा तीन आरोपी दुचाकीने संशयास्पद अवस्थेत जाताना दिसले. पोलिसांना पाहून ते पळू लागले. पोलिसांनी त्यांना पकडले. विचारपूस केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली.आरोपी गणेशसुद्धा चोरीच्या प्रकरणात सामील आहे. त्याची सासूरवाडी राजीवनगरात आहे. त्याची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी आली होती. पत्नीला भेटायला गणेश आला होता. अल्पवयीन आरोपीसोबत त्याची जुनी मैत्री आहे. त्यांच्या सांगण्यावरून तो घटनास्थळी गेला होता.संदीपचे मित्र आरोपींची संख्या जास्त असल्याचे सांगत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, वाढदिवसाच्या कार्यक्रमातून परत आल्यावर संदीप आपल्या मित्रांसोबत राजीवनगर बस स्टँडजवळ उभा होता. त्याचवेळी दहा-बारा युवक आले. ते संदीपच्या मित्रांना मारहाण करू लागले. त्यांना धमकावत तेथून जाण्यास सांगितले. आरोपींची संख्या अधिक असल्याने त्याचे मित्र तेथून निघून गेले. यानंतर संदीपला टेकडी परिसरात नेऊन त्याची हत्या केली.पाच तासात दोन खूनपाच तासात खुनाच्या दोन घटना घडल्याने पोलीसही हादरले आहेत. दोन्ही खुन क्षुल्लक वादातून झालेत. खुनासारख्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी अधिकाऱ्यांना या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :MurderखूनMIDCएमआयडीसीnagpurनागपूर