शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात युवकाचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:38 IST

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रॉपर्टी डिलरने एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जखमी युवकाने यशोधरानगर आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्या. दरम्यान गुन्हेगारांच्या माध्यमातून प्रॉपर्टी डिलरने युवकाला धमकावल्याने जखमी युवक तक्रार न करताच परत गेला.

ठळक मुद्देधमकी मिळाल्याने तक्रार करण्यास जखमीचा नकार : पाचपावलीत प्रॉपर्टी डिलरची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रॉपर्टी डिलरने एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जखमी युवकाने यशोधरानगर आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्या. दरम्यान गुन्हेगारांच्या माध्यमातून प्रॉपर्टी डिलरने युवकाला धमकावल्याने जखमी युवक तक्रार न करताच परत गेला.पीडित ३५ वर्षीय युवकाचे नाव सुनील आहे. तो प्लॉटचे मोजमाप करण्याचे काम करतो. सूत्रानुसार सुनीलचा प्रॉपर्टी डीलरसोबत पैशावरून वाद सुरू होता. सुनील मंगळवारी दुपारी नारा-नारी येथील एका प्लॉटची मोजणी करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी प्रॉपर्टी डिलर आपल्या साथीदारासह चार चाकी वाहनाने तिथे पोहोचला. त्याने सुनीलला मारहाण केली. तसेच बळजबरीने त्याला गाडीत बसवून आपल्या कार्यालयात नेले. कार्यालयात त्याला बंधक बनवून बेदम मारहाण केली. दरम्यान संधी मिळताच सुनीलने आपल्या पत्नीला फोन करून घटनेची माहिती दिली. असे सांगितले जाते की, सुनीलच्या पत्नीने नियंत्रण कक्षाला फोन करून सूचना दिली. परंतु घटनास्थळ माहिती नसल्याने ती व्यवस्थित माहिती देऊ शकली नाही. पोलिसांपर्यंत माहिती गेल्याची माहिती होताच प्रॉपर्टी डिलर व त्याचे गुन्हेगार साथीदारांनी सुनीलला मुक्त केले. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सुनील पत्नीसह यशोधरानगर पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्याने घटनेची माहिती दिली. यशोधरानगर पोलिसांनी त्याला पाचपावली पोलीस ठाण्यात पाठवले. सायंकाळी ५ वाजता तो पत्नीसह पाचपावली ठाण्यात गेला. त्याचवेळी प्रॉपर्टी डिलरही आपल्या साथीदारासह ठाण्यात पोहोचला. त्यांनी गुन्हेगार साथीदार व आपल्या भरवशाच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुनीलवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. आपल्या मदतीसाठी त्याने काही नेत्यांनाही बोलावून घेतले होते. प्रॉपर्टी डिलरची एकूण ताकद पाहता सुनीलने तक्रार न करणे येग्य समजले आणि तो घरी परत गेला. या घटनेने सुनील व त्याचे कुटुंबीय दहशतीत आहेत.पोलिसांवर केला होता हल्लाया प्रकरणातील प्रॉपर्टी डिलरने आठ वर्षांपूर्वी गुन्हे शाखेतील पोलीस दलावर हल्ला केला होता. तो अनेक दिवसांपासून जुगार अड्ड्याशी जुळलेला आहे. २००८ मध्ये गुन्हे शाखेने पाचपावली पोलीस ठाण्याद्वारे संचालित जुगार अड्ड्यावर धाड टाकून त्याला पकडले होते. त्यामुळे संतापून त्याने पोलिसांवरच हल्ला केला होता.

 

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण