आॅनलाईन लोकमतगडचिरोली-जोगीसाखरा ते वैरागड या मार्गावर तेंदू पत्त्याच्या गोण्यांची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरच्या इंजिनवर बसलेल्या युवकाला डुलकी लागल्याने तो खाली पडून ट्रॅक्टरच्या चाकात आल्याने जागीच ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. विनोद राजेंद्र कुमरे (वय २७) रा. गेवर्धा असे या तरुणाचे नाव आहे. सूर्यास्तानंतर तेंदू गोण्यांची वाहतूक करण्यास परवानगी नसताना, या भागात अनेक ठेकेदार अशी गैरकृत्ये करीत आहेत.
डुलकी लागल्याने ट्रॅक्टरखाली पडून युवकाचा मृत्यू
By admin | Updated: May 29, 2017 13:50 IST