शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बहिणीला भेटायला निघालेल्या काटोलच्या तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 23:43 IST

उड्डाणपुलाच्या वळणावर अपघात; दुचाकीवरून खाली पडला

नागपूर - मुंबईहून गावी परतल्यानंतर बहिणीच्या भेटीला निघालेल्या काटोलच्या एका तरुणाचा सदर उड्डाणपुलवर अपघात घडला. त्याची दुचाकी घसरून तो पुलाच्या खाली पडल्याने त्याचा करुण अंत झाला. गुरुवारी रात्री हा अपघात घडला.

जीवन माणिकराव जुमनाके (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मुंबईत एका कंपनीत मोठ्या हुद्दयावर काम करायचा. गुरुवारी सकाळच्या विमानाने तो नागपुरात आला. येथून मुळ गावी काटोलला गेला. दिवसभर कुटुंबीयांसोबत घालवल्यानंतर तो त्याच्या दुचाकीने नागपुरला निघाला. जीवनची बहिण भावना उईके अजनी रेल्वे वसाहतीत राहते. तिला भेटण्यासाठी जीवन त्याच्या दुचाकीने सदर उड्डाणपुलावरून गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास जात होता. ऑटो स्टॅण्डच्या वळणावर जीवनची अनियंत्रीत दुचाकी पुलावरच्या कठड्याला धडकली आणि दुचाकीवरून उसळून जीवन पुलाच्या खाली एका कारवर आदळला. मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. नंतर अनेकांनी जखमी जीवनकडे धाव घेतली. माहिती कळताच सदरचे ठाणेदार विनोद चाैधरी यांनीही आपल्या सहकाऱ्यांना पाठविले. जखमी जीवनला मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पूल बनला धोक्याचावाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी बनविण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे वळण जीवघेणे ठरले आहे. या वळणावर कोणताही दिशादर्शक नाही किंवा धोक्याचे संकेत देणारे रिफ्लेक्टर नाही. डायव्हरशनचेही संकेत नाही. त्यामुळे पाऊस सुरू असल्यास वाहनचालकांना वळण लक्षात येत नाही. त्यामुळे येथे नेहमीच अपघात घडत असल्याचे पोलीस सांगतात. बहिणीच्या भेटीला निघालेल्या जीवनचाही असाच अपघात झाला. विशेष म्हणजे, तो हेल्मेट घालून होता. मात्र, हेल्मेटचे हूक व्यवस्थीत न लावल्यामुळे हेल्मेट बाजुला पडले अन् त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जीव गेला.