शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाची भरदिवसा निर्घृण हत्या : कामठीच्या समतानगरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 21:04 IST

पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून काहींनी दुचाकीने जात असलेल्या तरुणावर आकस्मिक हल्ला चढविला. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची भरदिवसा निर्घृण हत्या केली.

ठळक मुद्देपोलीस खबऱ्या असल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कामठी) : पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून काहींनी दुचाकीने जात असलेल्या तरुणावर आकस्मिक हल्ला चढविला. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची भरदिवसा निर्घृण हत्या केली. ही घटना कामठी शहरातील समतानगर भागात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.सौरभ सिद्धार्थ सोमकुवर (१८, रा. लुंबिनीनगर, कामठी) असे मृताचे नाव आहे. सौरभ हा कामठी शहरातील गोयल टॉकीज परिसरात असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये काम करायचा. प्रकृती खराब असल्याने तो मागील काही दिवसांपासून कामावर गेला नव्हता. दरम्यान, त्याने मंगळवारी दुपारी वडील सिद्धार्थ यांना एमएच-४०/एवाय-५९९३ क्रमांकाच्या अ‍ॅक्टिव्हाने बसस्थानक परिसरात सोडले आणि त्याच अ‍ॅक्टिव्हाने भुयारी पूलमार्गे घराकडे जाण्यास निघाला. तो समतानगरात पोहोचताच तिथे दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढविला. त्यांनी सौरभच्या गळा, छाती, पोट व पाठीवर धारदार शस्त्राने एकूण १६ वार केले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तो खाली कोसळताच आरोपींनी तिथून पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याबाबत कळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात गर्दी केली होती. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावसदृश वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार संतोष बकाल करीत आहेत.गुन्हेगारी पार्श्वभूमीसौरभचा भाऊ सूरज हा चोरी करायचा. चोरीच्या प्रकरणात तो सध्या नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात आहे. मोबाईल चोरी प्रकरणात मोबाईलमध्ये आढळलेल्या सीमकार्डची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सौरभला विचारपूस करण्यासाठी ठाण्यात बोलावले होते. दुसरीकडे, सूरज चोरीचे साहित्य शहरातील काही चोरट्यांना द्यायचा आणि ते त्या साहित्याची विल्हेवाट लावायचे. दोन दिवसांपूर्वी जरीपटका (नागपूर) पोलिसांनी कामठी शहरातील या चोरट्यांच्या घरांची झडती घेतली होती. त्यांच्याकडे चोरीचे साहित्य असल्याबाबत सौरभ पोलिसांना माहिती देत असल्याचा त्यांचा संशय होता. त्यातून त्यांच्यात वादही उद्भवला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून