शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महागाई विरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 16:39 IST

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीसोबतच वाढत्या महागाई विरोधात युवक काँग्रेस बुधवारी रस्त्यावर उतरली. संविधान चौकात निदर्शने करीत दरवाढीचा निषेध करण्यात आला. महागाई वाढवून भाजप सरकार अच्छे दिन कसे आणणार, असा सवाल या वेळी कार्यकर्त्यांनी केला.

ठळक मुद्देसंविधान चौकात निदर्शने : अच्छे दिन कसे येणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीसोबतच वाढत्या महागाई विरोधात युवक काँग्रेस बुधवारी रस्त्यावर उतरली. संविधान चौकात निदर्शने करीत दरवाढीचा निषेध करण्यात आला. महागाई वाढवून भाजप सरकार अच्छे दिन कसे आणणार, असा सवाल या वेळी कार्यकर्त्यांनी केला.या आंदोलनात अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नितीन राऊत, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आ. अशोक धावड, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, कृष्ण कुमार पांडे, नितीन कुंभलकर, जुल्फिकार अहमद भुट्टो, किशोर जिचकार, दिनेश यादव,आयशा उईके, दीपक कापसे, कांता पराते, विजय बाबरे, श्रीकांत केकडे, रामाजी उईके, नरु जिचकार, सुरेश पाटील, कुणाल राऊत आदी सहभागी झाले. भाजपाने निवडणुकीपूर्वी जनतेला खोटी आश्वासने देत मोठमोठी स्वप्न दाखविली.मात्र, निवडणुकीनंतर एकही आश्वासन पाळले नाही. सातत्याने इंधन दरवाढ करून सामान्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकार पेट्रोल डिझेलवर अतिरिक्त कर लावून जनतेची लूट करीत आहे. या लुटारू सरकारला जनता नक्कीच धका शिकवेल, असा विश्वास यावेळी नितीन राऊत यांनी व्यक्त केला.या प्रसंगी कार्यकर्त्यांनी रिकामे गॅस सिलेंडर घेऊन ठाण मांडले. महागाईमुळे गृहिणी त्रस्त असल्याचे सांगत महिलाशक्ती भाजपाला हद्दपार करेल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी भाजपा विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. आंदोलनात आशिष मंडपे, कुणाल राऊत, धीरज पांडे,अजीत सिंह, नीलेश चन्द्रिकापुरे, अभिषेक सिंग, सदाब खान, राकेश निकोसे, आमिर नूरी, पंकज सावरकर, ऋषी कोचर, रिजवान खान रूमी, इंद्रसेन ठाकुर, बेबी गोरीकर, प्रकाश वानखेडे, जावेद खान, शेर सिंह पवार, विजय चिटमिटवार, सुनंदा राऊत, प्रकाश सदुण्के, ताराचंद चरडे, सुबोध कच्कलवर, चंदू वाकोडीकर, राजेश बालखेड़े, रमेश काकडे, दिलीप घोरपडे, सुनील नंदूकार, धीरज दहके, चेतन तरारे, सचिन वासनिक, राम यादव, शारदा सुफी, अनिरुद्ध पांडे, अविनाश फोड़े, फरमान अली, सुनील अवडे, मोतीराम गुप्ता, संतोष खडसे, अभिजित मेश्राम आदींनी भाग घेतला.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन